Jupiter Asta In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी अस्त आणि उदय होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा एखादा ग्रह अस्त होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर देखील दिसून येतो. एप्रिलच्या सुरुवातीला गुरु बृहस्पती अस्त करणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांनी यावेळी काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

वृषभ राशी

गुरु ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून बृहस्पति उत्पन्नाच्या घरात विराजमान होईल. तसंच वृषभ राशीच्या लोकांसाठी, बृहस्पति आठव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते. त्याच वेळी याकाळात तुम्ही नवीन नवीन गुंतवणूक करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तसेच यावेळी नवीन व्यवसाय सुरू करणे देखील टाळा.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह अस्त होणे हानिकारक ठरू होऊ शकते. कारण तुमच्या पारगमन कुंडलीत गुरू नवव्या भावात विराजमान असेल. जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. तसेच, कर्क राशीसाठी, गुरु सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. कर्क राशीच्या लोकांना या काळात कामात काही अडथळे येऊ शकतात. तसंच जर याकाळात तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्या सामानाची काळजी घ्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या काळात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

( हे ही वाचा: वसंत पंचमीपासून ‘या’ राशी होतील धनवान? माता सरस्वतीच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता अपार श्रीमंत)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्या राशी

गुरुची स्थिती तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण तुमच्या पारगमन कुंडलीतील आठव्या घराचा स्वामी गुरु आहे. यासोबतच कन्या राशीच्या लोकांसाठी गुरू हा चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुमचे तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर याकाळात तुमच्या तब्येतीत देखील बिघाड होऊ शकतो. तसंच नोकरीच्या ठिकाणी ज्युनियर आणि सीनियर्स सोबत काही मतभेद होऊ शकतात.