Guru Budh Labh Drishti 2025: ज्योतिष्यशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. यावेळी गुरू वृषभ राशीत आहे. तर दुसरीकडे, जर आपण ग्रहांच्या राजकुमाराबद्दल बोललो तर बुध मीन राशीत आहे. ५ मे रोजी दोन्ही ग्रह एकमेकांपासून ६० अंशांवर असतील, ज्यामुळे एक शक्तिशाली ‘त्रिकादश योग’ तयार होत आहे. याला ‘लाभ दृष्टी योग’ असेही म्हणतात. हा योग खूप फलदायी मानला जातो. गुरु-बुध यांच्या संयोगाने निर्माण होत असलेला हा शुभ योग कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरू शकते, ते जाणून घेऊया…

‘या’ राशींना अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध-गुरू यांच्या संयोगाने तयार होणारा त्रिएकादश योग मेष राशीसाठी लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. तुमच्या घरात नवीन वाहन येऊ शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये कुटुंबीयांचं सहकार्य मिळू शकते. जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला कुटुंब आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून फायदा होऊ शकतो. तसेच इतर माध्यमातून पैसे मिळू शकतात. अनेक लाभाच्या संधी तुम्हाला या काळात मिळू शकतात. अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.

मिथुन

लाभ दृष्टी योग मिथुन राशींच्या लोकांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारं ठरू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायाला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असल्यास ते करू शकता कारण तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.

मकर

लाभ दृष्टी योग मकर राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. या राशीच्या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. नोकरदार लोकांना यावेळी पदोन्नती मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या काळात वाहन आणि मालमत्ता मिळू शकते. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना या काळात चांगले यश मिळू शकते. इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)