Gajkesari Rahyog: २०२३ संपून २०२४ हे नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यावेळी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ मुहूर्तावर होत आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशीच ‘गजकेसरी योग’ तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, १ जानेवारी २०२४ रोजी चंद्र सिंह राशीत तर २९ डिसेंबर रोजी गुरु मेष राशीत असेल. वर्षाच्या सुरुवातीला गुरूची पाचवी दृष्टी सिंह राशीवर पडेल जिथे चंद्राच्या उपस्थितीमुळे गजकेसरी योग तयार होईल. हा योग अत्यंत शुभ मानला जात असून नवीन वर्षाची सुरुवात शुभ होत असल्याने काही राशींच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. येणाऱ्या नवीन वर्षात त्यांना सुख, समृध्दी, अपार यश लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

२०२४ मध्ये ‘या’ राशींना मिळणार अपार धन?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा मोठा फायदा होऊ शकतो. नवीन वर्षात या राशींच्या लोकांना अनेक क्षेत्रांतून, विशेषत: नोकरी आणि नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. या काळात हाती घेतलेले काम पूर्ण होण्याची शक्यता असून प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नफा होण्याची शक्यता असून सोबतच सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : २८ डिसेंबरपासून ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ? बुधदेव वक्री होताच मिळू शकते नशिबाला कलाटणी )

कर्क राशी

गजकेसरी योगामुळे कर्क राशीच्या लोकांना १ जानेवारीपासून चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांना विशेष लाभही मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. नवीन वर्षात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोकही यश मिळवू शकतात. शेअरमार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत नफा मिळू शकतो. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. सामाजिक आणि कामाच्या ठिकाणी नवीन संबंध तयार होऊ शकतात.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग वरदान ठरु शकतो. राजयोगाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. या काळात तुम्हाला नवीन व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. नोकरदार लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. अविवाहित लोकांचे लग्न जुळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)