Guru Gochar Twice in August: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह वेळोवेळी आपल्या स्थिती बदलतात आणि नक्षत्रही बदलतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देश-विदेशावरही होतो.
आगामी ऑगस्ट महिन्यात गुरु ग्रह दोन वेळा गोचर करणार आहेत. प्रथम, १३ ऑगस्ट २०२५ रोजी गुरु ग्रह पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करतील. त्यानंतर, ३० ऑगस्टला ते पुनर्वसू नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात जातील.
या गोचरामुळे काही राशींचे नशीब खुलू शकते. या लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. काम किंवा व्यवसायासाठी प्रवासाची संधीही मिळू शकते. चला तर मग, जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ शुभ आहे…
मेष राशी (Aries Horoscope)
तुमच्यासाठी गुरु ग्रहाचा दोन वेळा नक्षत्र बदल होणं फायदेशीर ठरू शकतं.या काळात व्यापाऱ्यांच्या मोठ्या व्यवसायिक डील्स होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले निकाल मिळतील. प्रेमसंबंध सुधारतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल आणि मान-सन्मानही मिळेल. सामाजिक ओळखींतून फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना पगार वाढण्याची आणि प्रमोशनची संधी मिळू शकते. तसंच तुमचं धाडस आणि आत्मविश्वासही वाढलेला दिसेल.
कर्क राशी (Cancer Horoscope)
गुरु ग्रहाच्या चालीत दोन वेळा होणारा बदल कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता. व्यवसायात नवीन पार्टनर्ससोबत काम करण्याची संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. लग्न झालेल्यांचं वैवाहिक जीवन आनंददायक राहील. तुमच्या जीवनसाथीच्या प्रगतीची शक्यता आहे. या काळात नशिबाची साथ मिळेल. अडलेली कामं पूर्ण होतील.
मीन राशी (Pisces Horoscope)
तुमच्यासाठी गुरु ग्रहाच्या चालीत होणारा बदल फायदेशीर ठरू शकतो, कारण गुरु ग्रह तुमच्या राशीचे स्वामी आहेत. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. नोकरी बदलण्यासाठी हा योग्य काळ आहे. पसंतीच्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना गुंतवणुकीतून फायदा होईल. आर्थिक परिस्थिती चांगली होईल. धन कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील. गुंतवणुकीतून लाभ मिळेल.