Guru Gochar In Mesh: ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा गुरू ग्रह त्यांच्या हालचाली बदलतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की गुरु ग्रह एप्रिलमध्ये मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हंस पंच महापुरुष राजयोग निर्माण होईल. त्याचबरोबर सर्व राशीच्या लोकांवर या योगाचा काही ना काही प्रभाव नक्कीच पडेल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांना या काळात चांगला नफा आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया ते कोणत्या आहेत या राशी…

मकर राशी

हंस महापुरुष राजयोग बनल्याने मकर राशीच्या लोकांना चांगला पैसा मिळू शकतो. कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या चौथ्या भावात हा योग तयार होणार आहे. ज्याला माता, संपत्ती, भौतिक सुखाचे स्थान मानण्यात येते. म्हणूनच यावेळी तुमच्य उत्पन्नात वाढ होऊ शकते. तसेच, यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. दुसरीकडे, जर तुम्ही परदेशी कंपनीशी करार करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्ण केले जाऊ शकते. कारण या योगाची दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडत आहे.

सिंह राशी

हंस महापुरुष राजयोग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीनुसार भाग्य स्थानात तयार होईल. त्यामुळे यावेळी तुमचे भाग्य चमकू शकते. तसेच व्यावसायिकांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबतीत प्रगती होऊ शकते. दुसरीकडे, ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर या काळात तुमच्या कुटुंबियांसोबत तुमचे नाते चांगले होईल.

( हे ही वाचा: ३० ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? राहूदेव वर्षभर देणार बक्कळ धनलाभाची संधी)

धनु राशी

२०२३ हे वर्ष तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. कारण १७ जानेवारीला शनिदेवाचे संक्रमण होताच या राशीच्या लोकांनां शनि साडेसती पासून मुक्ती मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या राशीतून हंस महापुरुष राजयोगही पाचव्या घरात तयार होणार आहे. जे संतती, उच्च शिक्षण आणि प्रेमसंबंध समजले जाते. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी असाल तर या कालावधीत तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकता. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना यावेळी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे )