Jupiter Saturn Horoscope: ज्योतिषानुसार नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रथम गुरु वक्री होतील आणि काही दिवसांनी शनी मार्गी होतील. सध्या शनी मीन राशीत मार्गी आहेत. कमी वेळात गुरु आणि शनी यांच्या गतीत बदल होणार असल्याने त्याचा मोठा परिणाम दिसेल.
कर्मानुसार फळ देणारे शनी हे न्यायाचे देव मानले जातात, तर गुरु हे ज्ञान, भाग्य आणि यश देणारे ग्रह आहेत. ज्योतिषशास्त्रात शनीला क्रूर ग्रह आणि गुरुला शुभ ग्रह मानले जाते. त्यामुळे या दोघांच्या गतीत झालेला बदल लोकांच्या जीवनावर महत्त्वाचा परिणाम करणार आहे.
१७ दिवसांत २ ग्रह त्यांच्या चाल बदलतील
११ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरु वक्री होतील आणि २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शनी मार्गी होतील. असा योग अनेक दशकांनंतर तयार होत आहे, जेव्हा नोव्हेंबर महिन्यात हे दोन्ही ग्रह कमी वेळात आपली चाल बदलत आहेत. जाणून घ्या, हा ग्रह गोचर कोणत्या राशींसाठी अतिशय शुभ आणि फलदायी ठरणार आहे.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शनी यांच्या गतीतला बदल चांगला ठरेल. या लोकांना वैयक्तिक जीवनात आणि कामाच्या ठिकाणी दोन्हीकडे फायदा होईल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, पैशांचा लाभ होईल आणि कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
गुरु आणि शनी यांच्या गतीतला बदल मकर राशीच्या लोकांसाठी शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. गुंतवणुकीतून फायदा होईल. त्याचबरोबर उत्पन्न वाढेल आणि तुम्ही पैसे साठवण्यातही यशस्वी व्हाल. अडकलेले पैसे मिळतील, थांबलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबाचा आधार मिळेल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशीचे स्वामी शनी देव आहेत आणि या राशीवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या लोकांसाठी शनीचे मार्गी होणे आणि गुरुचे वक्री होणे भाग्यदायक ठरेल. तुम्ही चांगल्या योजना बनवाल आणि त्या पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. मेहनतीचे फळ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. धन आणि प्रतिष्ठा वाढेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
