Guru and Shukra Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरू सध्या वृषभ राशीत असून तो १४ मे २०२५ रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत गुरू एक वर्ष राहील. त्यामुळे या राशीत गुरू आणि शुक्राची युती निर्माण होईल, गुरू-शुक्राची युती गजलक्ष्मी राजयोग निर्माण करते. हा योग अत्यंत शुभ आणि भाग्यकारी मानला जातो.

गजलक्ष्मी राजयोग कसा निर्माण होतो?

जेव्हा गुरू आणि शुक्र एकमेकांच्या केंद्र भावात, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या, सातव्या घरात असतात तेव्हा हा गजलक्ष्मी राजयोग निर्माण होतो.

‘या’ तीन राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.

सिंह (Singh Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींना गजलक्ष्मी राजयोग भाग्यकारी ठरेल. हा या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धन-संपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या योगाच्या प्रभावाने तुमच्या देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेमप्रकरणांमध्ये जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात गुरूच्या सानिध्यात राहिल्यास गुरूचा आर्शीवाद प्राप्त होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)