गुरू वक्री २०२५: ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी कर्क राशीत गुरू वक्री होत आहे. त्याच्या वक्री गतीचा फायदा अनेक राशींना होणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत बृहस्पति कर्क राशीत वक्री राहील आणि वृषभ राशीसह चार राशींना यश आणि आर्थिक लाभ मिळवून देईल. गुरूच्या वक्री गतीचा फायदा कोणत्या राशींना होईल त्याबाबत जाणून घेऊ…
११ नोव्हेंबर रोजी गुरू कर्क राशीत वक्री होणार आहे. याचा अर्थ, आता बृहस्पती उलट दिशेने जाईल. कोणत्याही ग्रहाची वक्री गती शुभ मानली जात नसली तरी, बृहस्पती हा एक शुभ ग्रह आहे. म्हणून बृहस्पतिच्या वक्री गतीनंतरही वृषभ आणि कन्यासह चार राशींना फायदा होणार आहे. या वर्षी बृहस्पती आक्रमक पद्धतीने कर्क राशीत पोहोचला होता. आता बृहस्पती ५ डिसेंबरपर्यंत कर्क राशीत वक्री राहणार आहे. अशा परिस्थितीत गुरूच्या वक्री गतीमुळे कोणत्या राशींना फायदा आणि यश मिळणार आहे ते जाणून घेऊ…
वृषभ राशी
वृषभ राशीसाठी गुरूची वक्री गती सामान्य राहील. या काळात त्यांना मध्यम लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबी चांगल्या राहतील. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यात तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यांच्याशी तुमचे संबंध सुधारतील. असं असताना या काळात तुम्हाला तुमच्या भावंडांवर बराच खर्च करावा लागू शकतो.
कन्या राशी
गुरूच्या वक्री गतीमुळे कन्या राशीच्या लोकांना नवीन मित्र मिळू शकतात. ते चांगले सहकार्य देखी देऊ शकतात. करिअरच्या बाबतीत हा काळ सकारात्मक परिणाम आणू शकतो. व्यावसायिकांनाही गुरूच्या आशीर्वादाचा फायदा होऊ शकतो. तुम्ही जे काही हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश आणि समाधान मिळेल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा बरेच चांगले होईल. तुमचे आरोग्य सामान्य राहील आणि कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाही.
वृश्चिक राशी
गुरूच्या वक्री गतीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या वाट्याला नशीब फळफळल्याची अनुभूति येईल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला कामं सोपवण्यात येतील. तुमच्या कामाच्या नैतिकतेमुळे आणि कठोर परिश्रमामुळे तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकेल. तुमच्या नेतृत्व कौशल्याची प्रशंसा केली जाईल. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल, या काळात तुम्हाला मोठी संपत्ती मिळू शकेल. तुम्ही तुमचे पैसे हुशारीने खर्च कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. असं असताना या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याशी संबंधित अडचणी येऊ शकतात.
धनु राशी
गुरू राशीच्या वक्री गतीमुळे धनु राशीच्या सुखसोयी वाढतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल, पण कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. या काळात गुंतवणूक चांगली परतफेड देऊ शकते. त्यामुळे मोठा नफादेखील मिळू शकतो. या काळात तुम्ही केलेल्या कोणत्याही कठोर परिश्रमाला यश मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी संमिश्र असेल. म्हणून तुमच्या कामाचे आधीच काळजीपूर्वक नियोजन करा. वैयक्तिक आघाडीवर तुम्हाला अधिका व्यावहारिक राहण्याची आवश्यकता आहे.
