Nav Varsh Shubh Rajyog: महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या दिवशी समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर उभी करतात आणि पूजा करून सण साजरा करतात. असे केल्याने कुटुंबात सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. या हिंदू नववर्षाच्या पर्वावर तीन शुभ राजयोग जुळून आले आहेत. सर्वार्थ सिध्दी योग, गजकेसरी राजयोग आणि अमृत सिध्दि योग घडून आला आहे. ज्यामुळे संपूर्ण १ वर्ष काही राशींना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे भाग्य चमकणार?
मेष राशी
मेष राशींच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष फायदेशीर ठरु शकतो. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. सुख-समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीचा योगही या काळात जुळून येऊ शकतो. दाम्पत्य जीवनात सुख लाभण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : शुक्राचे राशी परिवर्तन होताच जुळून आलेत ३ शुभ राजयोग; ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? २३ एप्रिलपर्यंत होऊ शकतात फायदेच फायदे )
कर्क राशी
हिंदू नववर्षापासून कर्क राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरु होऊ शकतात. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. आपल्याला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता असून आपली आर्थिक स्थिती भक्कम होण्याची शक्यता आहे. आपल्याला अचानक धनलाभ होऊ शकतो. अनेक स्रोतांमधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कामात येणारे अडथळे दूर होऊन आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्षापासून शुभ परिणाम मिळू शकतात. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)