scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, गुरूवार १ जून २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी बिनधास्तपणे वागून चालणार नाही.

Today Horoscope
राशीभविष्य १ जून २०२३ (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 1 June 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. काही कामे तुमचा कस पाहतील. व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

वृषभ:-

सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील. आर्थिक कामे वेळेत पार पडतील. वडीलांशी खटके उडू शकतात.

मिथुन:-

आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे. थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल. इतरांना स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.

कर्क:-

मनातील चिंतेला आवर घाला. कामात अधिकार्‍यांचा सल्ला मिळेल. कागदपत्रांची योग्य जुळवणी करावी लागेल. मनात काही गैरसमज उत्पन्न होऊ शकतात. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील.

सिंह:-

विसंवादाचे कारण उकरून काढू नका. मुलांवरील खर्च वाढू शकतो. भागीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. अडकून पडलेले काम मार्गी लागेल. प्रेमवीरांनी नसते साहस करू नये.

कन्या:-

कामे मन लावून करणे गरजेचे आहे. व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा. धार्मिक कार्याचा आनंद घ्याल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक फायद्यावर लक्ष केंद्रित राहील.

तूळ:-

मुलांबाबत चिंता निर्माण होईल. आजचा दिवस कष्टात जाईल. स्वातंत्र्यप्रिय विचार कराल. कौटुंबिक सौख्याकडे दुर्लक्ष करू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

वृश्चिक:-

प्रेमप्रकरणाला कलाटणी लागू शकते. उगाच राईचा पर्वत केला जाईल असे होऊ देवू नका. कामाव्यतिरिक्त इतर भानगडी निस्तराव्या लागतील. वेळेचा अपव्यय टाळावा. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील.

धनू:-

महत्वाकांक्षेच्या जोरावर कामे हाती घ्याल. छोट्याश्या अपयशाने खचून जाऊ नका. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागा. जोडीदाराशी मनमोकळा वार्तालाप करावा.

मकर:-

बिनधास्तपणे वागून चालणार नाही. जोडीदाराशी वाद वाढू शकतो. वयोवृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन कामात अधिक कष्ट पडतील. लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता.

कुंभ:-

महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. अती हटवादीपणा चालणार नाही. महत्वाकांक्षेला योग्य वळण द्यावे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

मीन:-

मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक बाजूंचा नीट अभ्यास करावा. स्थावर संबंधीचे प्रश्न उद्भवू शकतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा. कोर्टाची कामे निघू शकतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope 1 june 2023 daily astrology rashi bhavishya in marathi tmb 01

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×