Budh Nakshatra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, तर्क आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. बुध देखील त्याच्या राशीप्रमाणेच वेळोवेळी त्याचे नक्षत्र बदलतो. सध्या बुध शनीच्या अनुराधा नक्षत्रात बसला आहे आणि २० नोव्हेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. अनुराधा नक्षत्रात बुधाचा बदल अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या भाग्यवान राशी व्यवसाय, वित्त, करिअर आणि कुटुंबात सर्वात सकारात्मक बदल पाहू शकतात. अनुराधा नक्षत्रातील बुध ग्रहाचे भ्रमण कोणत्या तीन राशींसाठी शुभ असेल याबाबत जाणून घेऊ…
मिथुन राशी
बुध ग्रहाचे भ्रमण मिथुन राशीतील लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचे बोलणे गोड असेल. व्यवसायातील परिस्थिती सुधारू शकेल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि नातेसंबंध सुधारतील.
कन्या राशी
कन्या राशीतील बुध ग्रहाचे भ्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. कौटुंबिक सुख, शांती आणि समृद्धी राहील.
मकर राशी
अनुराधा नक्षत्रात बुध ग्रहाचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील. आर्थिक स्थैर्य वाढेल आणि तुम्ही चांगल्या व्यवसायाला सुरूवात कराल. तुम्हाला कोणत्याही कर्जातून मुक्तता मिळू शकेल. तसंच अडकलेल्या पैशाची परतफेड शक्य होईल. तुम्हाला मानसिकदृष्ट्या बरे वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल.
