Venus Rise In Gemini: ज्योतिषशास्त्रात देवतांचे गुरू बृहस्पती म्हणजे गुरू ग्रह आणि दैत्यांचे गुरू शुक्राचार्य म्हणजे शुक्र यांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीत बदल होताच त्याचा प्रभाव शुभ कार्यावरदेखील होतो. या दोन्ही ग्रहांचा अस्त होण्याने मंगल कार्ये थांबविली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचा २८ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी मेष राशीत अस्त झाला होता; ज्याचा २९ जून २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी मिथुन राशीत उदय झाला आहे. तसेच १९ मार्च २०२५ पर्यंत शुक्र त्याच स्थितीत राहील.

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला भौतिक सुख, धन, ऐश्वर्य, सौंदर्य व आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे जेव्हा कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो तेव्हा त्या कुंडलीच्या व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासत नाही.

मेष

शुक्र ग्रहाचा उदय मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा उदय सकारात्मक ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या

शुक्र ग्रहाचा उदय कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम फळ देणारे ठरेल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा उदय खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात फायदा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. घरात सकारात्मक वातावरण राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नात्यात गोडवा वाढेल. वैवाहिक जीवनही सुखमय असेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)