Shukra Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरावीक काळानंतर राशीमध्ये बदल करतो; ज्याचा जीवनावर परिणाम होतो. दरम्यान, यंदा मकर संक्रांत १५ जानेवारी २०२४ रोजी आहे. या दिवशी सूर्य देव धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर मकर संक्रांतीच्या काही दिवसांनी म्हणजे १८ जानेवारीला शुक्र धनू राशीत प्रवेश करील. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे हा राशीबदलही तितकाच महत्त्वाचा असतो. जेव्हा शुक्र शुभ असतो तेव्हा देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते. शुक्र हा सुख, शांती, विलास, आकर्षण, सौंदर्य व प्रेमाचा कारक मानला जातो. शुक्राच्या राशीबदलामुळे कोणत्या राशींना चांगले दिवस सुरू होऊ शकतात ते जाणून घेऊ…

‘या’ राशींचे उजळणार भाग्य?

७७ वर्षांनंतर मकर संक्रांतीला घडून येतोय ‘असा’ अद्भूत योग; श्रीमंत होतील ‘या’ राशीचे लोकं? भाग्यवान राशी कोणत्या?

मेष (Aries)

शुक्राचा धनू राशीतील प्रवेश होत असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो. या लोकांकडे अचानक प्रवासाची संधी चालून येईल, कुटुंब, मित्रपरिवारात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने हा महिना खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनतीची गरज न लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवता येऊ शकतो. जोडीदाराकडून चांगली साथ मिळू शकते.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीचे लोक नोकरी बदलणयाचा विचार करू शकतात. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामात यश मिळू शकेल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल; तसेच सर्वांकडून कोणत्याही कामात सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात त्यांना अनेक नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. जे काम कराल, त्यात फायदा होऊ शकतो, आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. कुटुंबात, मित्रपरिवारात किंवा नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी तुमचा मान, सन्मान, प्रतिष्ठा, पद वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे. तसेच कौटुंबिक वातावरणही चांगले राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांना प्रगतीबरोबर नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी काही चांगली बातमी मिळू शकते; ज्यामुळे महिन्याचा शेवटही आनंदी होण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. वैवाहिक जीवनात आनंद असेल; तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)