Today Rashi Bhavishya, 08 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Budh Gochar 2024 Aries budh transit in mesh these three zodiac sign will be success all sector
एक महिन्याने बुधाचे मेष राशीत गोचर; ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकेल नशीब? अचानक धनलाभाची शक्यता
Personality Traits
Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव

काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. परिश्रमाचे फळ मिळेल. कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमातील व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

गुंतवणुकीसाठी सल्ला महत्त्वाचा. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता लाभेल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

कामातील बदल लक्षात घ्या. काही नवीन तांत्रिक बाबी शिकून घ्या. कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल. विनाकारण बढाया मारू नका. मेहनतीच्या जोरावर प्रगती करता येईल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

नवीन व्यवहार करताना विचार करावा. घरासाठी काही खर्च कराल. कौटुंबिक जबाबदार्‍या प्राधान्याने पार पाडाल.  थोडी काटकसर करावी लागेल. दिवस मध्यम फलदायी.

सिंह (Leo Horoscope Today ):-

जुने आजार अंगावर काढू नका. व्यापार्‍यांना हा‍तमिळवणी करावी लागेल. नोकरदारांनी आळस करू नये. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. वडीलांचे मोलाचे सहकार्य लाभेल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

घरात धार्मिक कार्य घडेल. मन उत्साही राहील. मित्रांच्या सहवासात रमाल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

कणखरपणा योग्य तिथेच दाखवा. दिवस मनासारखा घालवाल. कामाचा ताण जाणवेल. योग्य ताळमेळ साधता येईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

कौटुंबिक समतोल राखावा. प्रेम व्यक्त करा. मनाची चंचलता सांभाळावी. कामाच्या बाबतीत हयगय करू नका. समस्यांचे निराकरण शक्य.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

घरातील वातावरण शांत ठेवा. नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील. तज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग. प्रलंबित कामे मार्गी लावा. दैनंदिन कामात टाळाटाळ करू नका.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

घरातील गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भावंडांची काळजी लागून राहील. प्रवास जपून करावा.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील. मन:शांति लाभेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

व्यवसायिकांना उत्तम काळ. नवीन घडामोडी घडतील. क्षुल्लक गोष्टींचा त्रास जाणवेल. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. मानसिक स्वास्थ्य जपावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर