मेष:-

अतिविचार करणे टाळावे लागेल. कामाचा बोजा वाढल्याने थकवा जाणवेल. आवडीच्या गोष्टी खरेदी कराल. आपली संगत तपासून पहावी. वाचनातून रहस्यमय गोष्टींची आवड पूर्ण कराल.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
28 March Panchang Sankashti Chaturthi Mesh To Meen
आज संकष्टी चतुर्थीला मेष ते मीनपैकी कुणाच्या कुंडलीत मोदक पेढ्यांचा गोडवा? बाप्पा वर देणार की दंड, वाचा

वृषभ:-

कामात चिकाटी ठेवावी लागेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळेल. आर्थिक गणिते मनाजोगी पूर्ण होतील. तरुण वर्गाचे मत विचारात घ्याल.

मिथुन:-

मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कमिशनमधून चांगला लाभ होईल. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

कर्क:-

अधिकारी व्यक्तींचा सल्ला मिळेल. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या बोलण्याची उत्तम छाप पडेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

सिंह:-

वडीलधार्‍यांचा योग्य मान ठेवाल. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी. लहान-सहान गोष्टींनी नाराज होऊ नका. अति विचाराने मानसिक तान येऊ शकतो. छंदासाठी वेळ द्यावा.

कन्या:-

भागीदाराशी सलोखा वाढेल. नवीन व्यावसायिक धोरण ठरवाल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा होतील. सहकुटुंब जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ:-

जोडीदाराची आवक वाढेल. कौटुंबिक शांतता जपावी. काही कामे कमी कष्टात पार पडतील. अपचनाचा त्रास जाणवेल. कफ विकारांपासून काळजी घ्यावी.

वृश्चिक:-

जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. खर्चाचा आकडा वाढू शकतो. पत्नीच्या सहवासात रमून जाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यावसायिक पाऊले जपून उचलावीत.

धनू:-

घरातील वातावरण खेळकर राहील. कामे आनंदात पार पडतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. दिवसभर कामात गुंतून राहाल.

मकर:-

आततायीपणे कोणतेही काम करू नका. जवळचा प्रवास घडेल. भावंडांची मदत घ्यावी लागेल. शांत व संयमी विचार करावा. हातून चांगले लिखाण होईल.

कुंभ:-

सामाजिक बांधीलकी जपाल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. आवडी बाबत आग्रही राहाल. बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल. बाग-बगीच्याच्या कामात मन गुंतवाल.

मीन:-

सर्वांशी लाडिकपणे बोलाल. आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मैत्रीचे संबंध जपावेत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर