Article Body: Dainik Horoscope Highlight’s : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope Highlight's 13 May 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह १३ मे २०२५

17:54 (IST) 13 May 2025

Numerology Prediction : या तारखेला जन्मलेले लोक होऊ शकतात IAS-IPS! धाडस अन् चांगल्या नेतृत्व करण्यासाठी असतात सर्वांच्या पुढे

Numerology Prediction News in Marathi : कोणत्या मूलांकाचे लोक होऊ शकतात IAS- IPS? कोणत्या तारखेला जन्मतात हे लोक? ...अधिक वाचा
17:54 (IST) 13 May 2025

Numerology Prediction : या तारखेला जन्मलेले लोक होऊ शकतात IAS-IPS! धाडस अन् चांगल्या नेतृत्व करण्यासाठी असतात सर्वांच्या पुढे

Numerology Prediction News in Marathi : कोणत्या मूलांकाचे लोक होऊ शकतात IAS- IPS? कोणत्या तारखेला जन्मतात हे लोक? ...अधिक वाचा
17:52 (IST) 13 May 2025

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope in Marathi)

मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. व्यापाराच्या नवीन योजना आखल्या जातील. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.

17:43 (IST) 13 May 2025

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope in Marathi)

सर्वांना मनापासून मदत कराल. जवळचे मित्र जमवाल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

17:19 (IST) 13 May 2025

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope in Marathi)

शांत व संयमी विचारांची आवश्यकता. व्यवहारी भूमिका ठेवून वागाल. सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल.

17:09 (IST) 13 May 2025

शनी-बुधदेवाची बदलणार चाल; जुलैपासून उघडणार तुमच्या नशिबाचे दार? वाईट काळ संपून सुरु होणार सुवर्णकाळ? मिळू शकतो प्रचंड पैसा

Shani Dev And Budh Vakri 2025: बुध ग्रह व शनि वक्री होताच यामुळे काही राशींना अपार पैसा मिळण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
15:25 (IST) 13 May 2025

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope in Marathi)

तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे. ऐषारामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. भावंडांशी मतभेद संभवतात. कामातून आनंद व समाधान

14:25 (IST) 13 May 2025

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope in Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.

13:39 (IST) 13 May 2025

साडेसाती संपणार! २६ मे पासून शनिमहाराज 'या' राशींवर होणार मेहेरबान? ३० वर्षांनंतर शनैश्चरी अमावस्येला गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल

Shani Transit 2025 Effects: ३० वर्षानंतर शनि अमावस्येला दुर्लभ योग घडून येत आहे. त्यामुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. नेमक्या या राशी कोणत्या व त्यांना कोणत्या स्वरूपात काय लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया.. ...सविस्तर बातमी
13:04 (IST) 13 May 2025

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope in Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.

12:36 (IST) 13 May 2025

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope in Marathi)

सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी.

12:26 (IST) 13 May 2025

Vastu Tips: तुम्हीही घरी दाराच्या मागे कपडे लटकवताय? वाईट परिणाम माहितीयेत का? कधीही करू नका ही चूक, नाहीतर...

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही दारामागे कपडे लटकवत असाल तर आजपासूनच ही सवय बदला, अन्यथा... ...अधिक वाचा
12:17 (IST) 13 May 2025

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope in Marathi)

मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.

11:22 (IST) 13 May 2025

केतु ग्रहाला प्रिय असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक; आयुष्यात अचानक मिळते अपार धन संपत्ती अन् बनतात करोडपती

ketu grah favourite people : केतू ग्रहाला एक खास मूलांक खूप जास्त प्रिय आहे आणि त्या मूलांकच्या लोकांचे अचानक नशीब चमकू शकते. तो मूलांक कोणता जाणून घ्या. ...सविस्तर वाचा
10:47 (IST) 13 May 2025

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope in Marathi)

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल.

10:26 (IST) 13 May 2025

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope in Marathi)

अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

10:07 (IST) 13 May 2025

१२ वर्षांनंतर गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; गुरु आणि शुक्र ग्रहाचे अपार आशीर्वाद असतील, अचानक होईल आर्थिक लाभ

Gajlaxmi Rajyog In Kundli : वैदिक दिनदर्शिकेनुसार गुरू गोचर करून गजलक्ष्मी राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. ...सविस्तर बातमी
09:27 (IST) 13 May 2025

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope in Marathi)

पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल. बाह्य गोष्टींचे आकर्षण वाढू शकते. मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा.

09:26 (IST) 13 May 2025

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope in Marathi)

हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल. आवडत्या कामात दिवस घालवाल.

09:13 (IST) 13 May 2025

मेष राशिभविष्य (Aries Horoscope in Marathi)

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.

07:48 (IST) 13 May 2025

Daily Horoscope : मेष ते मीन पैकी कोणत्या राशीला कोणत्या रूपात होणार लाभ? मंगळवारी तुम्हाला कसे लाभेल सुख? वाचा राशिभविष्य

Daily Horoscope in Marathi, 13 May 2025 : १३ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा आहे. प्रतिपदा रात्री १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत राहील. विशाखा नक्षत्र सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर अनुराधा नक्षत्र जागृत होईल. त्यानंतर सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत परिघ योग जुळून येईल. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर आज मंगळवार कोणत्या राशीसाठी शुभ ठरणार हे आपण जाणून घेऊया…

Horoscope Today in Marathi Live 13 May 2025

आजचे राशिभविष्य १३ मे २०२५ रोजी मराठी (सौजन्य - फ्रिपीक) 

Highlight's 13 May 2025: १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.