Today Rashi Bhavishya, 25 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

mpsc
mpsc मंत्र: गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा: पर्यावरण
Nakshatra transformation of Ketu These three zodiac signs will bring happiness
८ सप्टेंबरपर्यंत पैसाच पैसा! केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी अन् मानसन्मान
After 50 years Sun-Saturn will create Shadashtak Yoga
५० वर्षांनंतर सूर्य-शनी निर्माण करणार ‘षडाष्टक योग’; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना करावा लागणार अडचणींचा सामना
Most Determined Zodiac Signs You can do anything to achieve your goals
अत्यंत जिद्दी असतात ‘या’ राशींचे लोक! आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही संकटाचा सामना करू शकतात
loksatta editorial on election results in france left wing alliance won most seat in french
अग्रलेख : फ्रेंच ट्विस्ट!
BJP has undeniably grown in Kerala Kerala CPI chief Binoy Viswam
केरळमधील निष्ठावान मतदारही भाजपाकडे गेले; आत्मपरीक्षणाची गरज डाव्यांनी केली मान्य
NEET exam scam University Admission exam National Testing Agency
लेख: अविश्वासाच्या राजकारणातून परीक्षांचे केंद्रीकरण..
Loksatta kutuhal Artificial Intelligence for Anomaly Detection in Financial Transactions
कुतूहल: वित्तव्यवहारांत विसंगती शोधक कृत्रिम बुद्धिमत्ता

मेष (Aries Horoscope Today ):-

शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील. मित्रांशी वाद घालू नयेत.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

चिडचिड न करता कामाला गती द्या. छानछोकीसाठी खर्च कराल. व्यापारातून चांगला लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. मनाच्या चंचलतेला आवर घाला. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. कामातून समाधान मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. संयमाने परिस्थिती हाताळावी.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

जुन्या विचारात गुंतून राहू नका. आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. मानसिक शांतता जपावी.

मीन (Pisces Horoscope Today ):-

आपला संयम सुटू देऊ नका. घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. नवीन सुरुवात दिलासादायक असेल. जुने मित्र भेटतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर