Dainik Horoscope Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope Live 6 September 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ६ सप्टेंबर २०२५:

12:50 (IST) 7 Sep 2025

९ सप्टेंबरला पितृपक्षात शुक्राचं गोचर 'या' ३ राशींसाठी ठरेल वरदान! अफाट पैसा तर घरात आनंदाचे वातावरण; जीवनात अखेर येईल प्रेम

Pitru paksha Shukra Gochar: ९ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रह अश्‍लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातइ प्रवेश करेल. ३ सप्टेंबरलाच शुक्र ग्रहाचा अश्‍लेषा नक्षत्रात प्रवेश झाला होता. शुक्र १५ सप्टेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहील. याचा सर्व १२ राशींवर परिणाम होईल. चला तर मग जाणून घेऊया, त्या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत. ...सविस्तर वाचा
14:40 (IST) 6 Sep 2025

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

मित्रांबरोबर काळ चांगला जाईल. काही संमिश्र घटना घडू शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे. टीमवर्कचा चांगला फडा होईल.

14:19 (IST) 6 Sep 2025

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

कामात अधिकार प्राप्त होतील. कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.

14:11 (IST) 6 Sep 2025

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

मनोरंजनात्मक दिवस. उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्रांशी नाते अतूट होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्जाऊ रक्कम कमी होईल.

14:09 (IST) 6 Sep 2025

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

येणे वसूल होईल. दिवस चांगला जाईल. भौतिक वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

14:00 (IST) 6 Sep 2025

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

आज मनाप्रमाणे कामे कराल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आज चांगले शुभ योग जुळून येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा.

12:50 (IST) 6 Sep 2025

अनंत चतुर्दशीला बाप्पा ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासह वैवाहिक जीवनात येईल सुख-शांती; वाचा राशिभविष्य

Daily Horoscope In Marathi 6 september 2025 : आज ६ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज अतिगंड योग जुळून येईल आणि धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ९ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज अनंत चतुर्दशी असणार आहे. गणपती बाप्पा निरोप देताना कोणत्या राशीच्या आयुष्यात धन, सुखाचा वर्षाव करणार जाणून घेऊयात…सविस्तर वाचा

12:41 (IST) 6 Sep 2025

१५ सप्टेंबरपासून 'या' ३ राशींच्या नशिबी मोठं यश! करिअरमध्ये प्रगती, पगारवाढ अन् घरात वाढेल आनंद; आनंदाची बातमीही मिळेल

१५ सप्टेंबरला बुध ग्रह आपल्या उच्‍च राशीत म्हणजे कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. ...सविस्तर बातमी
11:07 (IST) 6 Sep 2025

गणपती बाप्पा ३ राशींना देणार पैसाच पैसा! अनंत चतुर्दशीला ४ शुभ महासंयोग कोणाल करेल मालामाल?

Ganesh visarjan 2025: ६ सप्टेंबर रोजी गणेश विजर्सनचा दिवस ४ शुभ योगांचा महासंगम तयार होत आहे. रवि योग, सुकर्मा, धनिष्ठा नक्षत्र आणि शतभिषा नक्षत्र ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी असेल. या शुभ योगांमध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. सविस्तर वाचा

11:05 (IST) 6 Sep 2025

मिळेल अपार पैसा! तूळ राशीत बुध-मंगळाची दुर्मिळ युती! 'या' ३ राशींच्या प्रगतीचा योग

Budh Mangal Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, बुद्धिमत्ता, व्यवसायिक संपत्तीचा स्वामी मानले जाते. तर मंगळ ग्रहाला पृथ्वी, पराक्रम आणि साहसाचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबरमध्ये तूळ राशीत बुध आणि मंगळाची युती होणार आहे. ही युती तिन्ही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फायदेशीर मानली जाते. सविस्तर वाचा

numerology-concept-composition

आजचे राशिभविष्य लाईव्ह ६ सप्टेंबर २०२५ (फोटो सौजन्य - फ्रिपीक)