Dainik RashibhavishyaUpdates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

आजचे राशिभविष्य १ मे २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी.

Live Updates

आजचे राशिभविष्य १ मे २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी.

15:48 (IST) 1 May 2025

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

नातेवाईकांचा विरोध वाढू शकतो. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत. उष्णतेचे विकार बळावू शकतात कौटुंबिक बाबींमध्ये विशेष लक्ष घालावे

15:47 (IST) 1 May 2025

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीतील लाभाकडे काटेकोरपणे लक्ष द्या. कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका.

15:01 (IST) 1 May 2025

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

घरगुती समस्या दूर कराव्यात. विरोधाला बळी पडू नका. चांगल्या संगतीत रमून जाल. नवे अनुभव गाठीशी  बांधाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल.

14:23 (IST) 1 May 2025

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करावा. आलेली संधी सोडू नका. मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

14:19 (IST) 1 May 2025

Shash Rajyog : शश राजयोगाने 'या' राशींचे पालटणार नशीब; शनीच्या कृपेने होईल संपत्तीची प्राप्ती अन् नांदेल कुटुंबात सुख

Shash Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या कुडलीत शश राजयोग निर्माण होतो, त्या व्यक्तींना श्रीमंतीचा योग आहे. त्यांना समाजात मिळणारा आदर, सन्मान वाढू शकतो. ...वाचा सविस्तर
12:39 (IST) 1 May 2025

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

नवीन मैत्रीचे संबंध जुळून येतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामाच्या ठिकाणी हयगय करू नका. क्षुल्लक गोष्टींमुळे मनस्ताप संभवतो. जोडीदाराच्या वागण्याचा शांतपणे विचार करावा

11:59 (IST) 1 May 2025

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज नकोत. कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा. वरिष्ठांची मर्जी राखावी

11:53 (IST) 1 May 2025

सूर्य-चंद्रच्या युतीमुळे निर्माण होणार दुर्मिळ व्यतिपात योग ५ राशींसाठी ठरणार मंगलदायी! नोकरी व्यवसायामध्ये होईल मोठी प्रगती

Benefits of Sun Moon Vyatipat Yoga : ज्योतिष्यशास्त्राानुसार, सूर्य आणि चंद्राची युती ५ मे रोजी सकाळी १०वाजून १२मिनिटांनी होईल. ...वाचा सविस्तर
11:19 (IST) 1 May 2025

बुधाची वक्री चाल बक्कळ पैसा देणार! 'या' तीन राशीच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ, करिअरमध्येही यश मिळणार

Budh Vakri 2025: जूनमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध कर्क राशीत वक्री होणार आहे. ज्याच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींचा सुवर्णकाळ सुरू होईल. ...वाचा सविस्तर
10:25 (IST) 1 May 2025

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

गप्पा गोष्टींमधून विनोद निर्मिती कराल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कलेला पोषक वातावरण लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. उत्तम विचार मांडा

10:14 (IST) 1 May 2025

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

आत्मविश्वास वाढीस लागेल. ठामपणे विचार नोंदवाल. मैत्रीतील दुरावा वाढू देवू नये. नवीन संधीकडे लक्ष द्यावे. सढळ हाताने मदत कराल.

09:34 (IST) 1 May 2025

आता दु:खाचे दिवस संपणार! आजपासून 'या' राशींचे नशीब क्षणात पालटणार? चंद्राचे भ्रमण घेऊन येणार अपार पैसा अन् प्रसिद्धी?

Chandra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे मिथुन राशीतील भ्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकते. भाग्यशाली राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊया... ...अधिक वाचा
08:57 (IST) 1 May 2025

५ वर्षांनंतर भद्र महापुरुष अन् बुधादित्य राजयोग; 'या' राशीच्या लोकांचे सुरु होणार 'अच्छे दिन', उत्पन्नात होईल प्रचंड वाढ

Bhandra And Budhaditya Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, भद्रा आणि बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे १२ पैकी ३ राशींचे नशीब चमकू शकते. ...वाचा सविस्तर
08:11 (IST) 1 May 2025

१८ वर्षानंतर सिंह राशीमध्ये गोचर करणार केतु ग्रह! 'या' तीन ग्रहांचे चमकणार करिअर, इंक्रिमेंटसह मिळणार डबल प्रमोशन

Ketu Transit 2025 In Marathi : केतु ग्रह १८ मे रोजी सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १८ वर्षानंतरच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर केतु या राशीमध्ये परतले आहे. त्यामुळे याचा परिणाम तीन राशींवर दिसून येईल. ...अधिक वाचा
07:54 (IST) 1 May 2025

३० वर्षानंतर शनि होणार वक्री, 'या' राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, पदोन्नतीसह धनलाभाची संधी

Shani Gochar 2025 : वैदिक कॅलेंडरनुसार, कर्माचे फळ देणारा शनि १३ जुलै रोजी सकाळी ९:३६ वाजता मीन राशीत वक्री होईल आणि सुमारे १३८ दिवस वक्री होईल. ...अधिक वाचा
07:18 (IST) 1 May 2025

Daily Horoscope: आज बाप्पा कोणत्या रूपात देणार तुम्हाला हिंमत? कोणाचा वाढेल आत्मविशास तर कोणाच्या घरगुती समस्या होतील दूर; वाचा राशिभविष्य

Horoscope Today in Marathi, 1 May 2025 : महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाप्पा तुम्हाला कसा आशीर्वाद देणार हे आपण जाणून घेऊया... ...सविस्तर वाचा

Aajche Rashi Bhavishya In Marathi

राशिभविष्य १ मे २०२५! (फोटो सौजन्य: @Freepik)

Today's Horoscope : आज कोणत्या राशींना फायदा होणार, कोणत्या राशींचे नुकसान होणार? ग्रह, नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशींवर होणार परिणाम? कोणत्या मुलांकच्या लोकांचा स्वभाव कसा आहे? चाणक्य नीतिनुसार कसे जगावे आयुष्य? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर.