Dainik Rashi Bhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
आजचे राशिभविष्य लाईव्ह २५ मे २०२५ : Daily horoscope live updates in Marathi
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope in Marathi)
बदल लक्षात घेऊन वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope in Marathi)
क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope in Marathi)
काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope in Marathi)
भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope in Marathi)
वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांति जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope in Marathi)
स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope in Marathi)
जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.
Budh Gochar 2025 : बुधाच्या वृषभ राशीतील प्रवेशाने 'या' राशींच्या लोकांवर कोसळेल अडचणींचा डोंगर; उद्भवणार आर्थिक समस्या
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope in Marathi)
सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल . जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope in Marathi)
अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope in Marathi)
जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope in Marathi)
कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope in Marathi)
कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल.
Weekly Horoscope : या आठवड्यात ७ राशींच्या लोकांचे नशीब बदलणार! करिअरमध्ये होईल पदोन्नती, जाणून साप्ताहिक राशीभविष्य…..
Today Horoscope: शिवरात्रीला मेष ते मीन राशींपैकी कोणाचे नशीब चमकणार; कोणावर होईल शिवशंकराची कृपा; तुमचे राशिभविष्य वाचा
दैनिक राशिभविष्य लाईव्ह अपडेट