Lucky zodiac signs July 2025: जुलै महिना काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. जूनप्रमाणेच जुलैमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार असून, हा महिना काही राशींना चकित करणाऱ्या यशाचा आणि समृद्धीचा वर्षाव घेऊन येतोय. ग्रह-नक्षत्रांची अनुकूल स्थिती पाच भाग्यशाली राशींवर कृपादृष्टी ठेवणार आहे. त्यांना आयुष्यात सुख, समृद्धी व पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
जुलैमध्ये ‘या’ राशींना धन, गाडी आणि यश सगळं मिळणार!
मेष
मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होऊन बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीत तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. सामाजिक प्रतिष्ठाही वाढू शकते. अडलेला पैसा परत मिळू शकतो. वडिलांच्या मदतीनं एखादं महत्त्वाचं काम मार्गी लागू शकतो. या काळात घरातील वातावरण आनंदी राहू शकतो.
वृषभ
जुलै महिन्यात वृषभ राशीच्या लोकांच्या अनेक जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. प्रेमप्रकरणात यश, तर व्यक्तींना विवाहाचे शुभ संकेत मिळतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू शकतो आणि तुमच्या संचित संपत्तीतही वाढ होऊ शकते. प्रगतीचे द्वार खुले होऊ शकतात. करिअरमध्ये तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात.
तूळ
या महिन्यात तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. व्यवसायात वाढ होऊ शकते. महत्त्वाची डील फायनल होऊ शकते. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. घरात सुख-शांती नांदू शकते. प्रेम जीवनातही आनंद राहू शकतो. वाहन खरेदीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.
धनु
जरी शनीची ढैय्या चालू असली तरी जुलै महिना धनु राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. परदेश शिक्षण किंवा करिअरसाठी शुभ बातमी मिळू शकते. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अनपेक्षित नफा मिळण्याची अपेक्षा आहे. अविवाहित लोकांसाठी साखरपुडा किंवा लग्नाचे योग आहेत.
कुंभ
कुंभ राशीसाठी जुलै महिना प्रगतीचा असेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात नवी कामं सुरू होऊ शकतात. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातून भरपूर नफा कमवू शकाल. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. नातेसंबंधात प्रेम आणि विश्वास वाढेल. आपल्या कार्यानं समाजात आपला मान-सन्मान वाढू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)