Jupiter-Venus Yuti create samsaptak rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. तर शुक्र ग्रहाला सौंदर्य, आकर्षण आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ मध्ये गुरू ग्रह दुप्पट वेगाने चालत आहे ज्यामुळे तो एका राशीत केवळ सहा महिने असेल. या वर्षात गुरू मिथुन नंतर कर्क आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, ५ डिसेंबर रोजी गुरू पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल आणि शुक्र २० डिसेंबर रोजी ७ वाजून ५० मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मिथुन राशीतील गुरू आणि धनु राशीतील शुक्र एकमेकांपासून सातव्या घरात विराजमान असतील. ज्यामुळे समसप्तक राजयोग निर्माण होईल. हा योग काही राशींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
समसप्तक योग तीन राशींचे नशीब चमकवणार
मिथुन (Mithun Rashi)
समसप्तक योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत फायदेशीर असेल. हा या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धन-संपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.
तूळ (Tula Rashi)
समसप्तक योग तूळ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या योगाच्या प्रभावाने तुमच्या देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेमप्रकरणांमध्ये जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात गुरूच्या सानिध्यात राहिल्यास गुरूचा आर्शीवाद प्राप्त होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)