Zodiac Signs Relationship: ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मतारीख, वेळ व ठिकाण या गोष्टींचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीची कुंडली काढली जाते. त्याव्यतिरिक्त १२ राशी, २७ नक्षत्रे, मूलांक, भाग्यांक, जन्म वार, जन्म महिना यांच्यावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुणांबद्दल भाष्य केले जाते. दरम्यान, आज आपण १२ राशींतील अशा काही राशींच्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या जोडीदाराबरोबर कधीही प्रामाणिक रहात नाहीत. या राशीच्या व्यक्तींना एकाच व्यक्तीबरोबर दीर्घकाळ नात्यात राहणं त्रासदायक असतं. हे लोक ब्रेकअप आणि घटस्फोट घेण्यातही स्वतःहून पुढाकार घेतात.
‘या’ राशीचे लोक जोडीदाराचा करतात विश्वासघात
मिथुन
मिथुन राशीचा राशी स्वामी बुध ग्रह असून या राशीचे लोक मनाने चंचल असतात. या राशीच्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराने २४ तास आपल्याशीच बोलावं, आपल्यालाच महत्त्व द्यावं असं वाटतं. परंतु, जेव्हा त्यांच्या या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा हे लोक आपल्या जोडीदाराचे आपल्यावर प्रेम नाही असा गैरसमज करून घेतात आणि नात्यामध्ये स्वतःहून दुरावा निर्माण करतात. जोडीदाराकडून त्यांना हवे तसे प्रेम आणि सन्मान न मिळाल्यास हे लोक आपल्या जोडीदाराला सोडून जातात.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात अहंकार असतो. इतरांपेक्षा आपण किती सुंदर आणि हुशार आहोत हे सतत ते सिद्ध करत असतात. अशी तुलना ते अनेकदा आपल्या जोडीदाराबरोबरदेखील करतात, ज्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम कमी आणि स्पर्धा अधिक पाहायला मिळते. जोडीदाराकडून यांना अनेक मोठमोठ्या अपेक्षा असतात, परंतु या अपेक्षा जेव्हा पूर्ण केल्या जात नाहीत, अशावेळी हे लोक नात्याला पूर्णविराम देतात.
कन्या
कन्या राशीचे लोक स्वभावाने खूप प्रेमळ असतात, त्यामुळे एखाद्या नात्यात हे लोक पटकन अडकतात. आपल्या जोडीदाराने सतत आपल्या सोबत राहावे, रोमाँटिक वागावे अशा यांच्या अपेक्षा असतात. परंतु, समोरचा जेव्हा या अपेक्षा पूर्ण करत नाही तेव्हा हे लोक जोडीदाराची साथ सोडून देतात.
कुंभ
कुंभ राशीचे लोक खूप गर्विष्ठ आणि व्यवहारिक असतात. त्यांच्या याच स्वभावामुळे ते इतरांपेक्षा वेगळे आणि एकटे असतात. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला यांना आवडते, त्यामुळे एखाद्या संवेदनशील किंवा रोमँटिक व्यक्तीबरोबर यांचा मेळ बसत नाही, त्यामुळे हे लोक आपल्या जोडीदारापासून दूर होतात.
मीन
मीन राशीचे लोक अत्यंत दयाळू आणि भावनिक असतात. हे लोक प्रत्येक गोष्टीचा विचार डोक्याने कमी आणि मनाने जास्त करतात. आपल्या सारखेच इतरांनीही असावे असे यांना वाटते. रागीट, भांडखोर आणि अहंकारी लोकांबरोबर यांचा मेळ बसत नाही. जेव्हा या राशीच्या लोकांच्या आयुष्यात असा जोडीदार येतो, तेव्हा कालांतराने ते नात्यात दुरावा निर्माण करतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)