Ketu nakshatra transit 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये केतुला क्रुर ग्रह आणि छाया ग्रह मानले जाते. राहु केतु ग्रह दिड वर्षानंतर गोचर करतात. पण अनेकदा या दरम्यान ते नक्षत्र परिवर्तन करतात. जुलै महिन्यात केतु ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. यामुळे काही राशींचे नशीब बदलू शकते. केतु ग्रह जेव्हा कृपा दाखवतो तेव्हा राशींना मालामाल करतो. जुलै महिन्यात केतुच्या स्थितीत होणारा बदल तीन राशीच्या लोकांना अपार धन लाभ करून देऊ शकतो. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या?
केतु ग्रहाचा पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश
६ जुलै रोजी केतु पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. केतुचा पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश तीन राशीच्या लोकांना आर्थिक, व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. या लोकांचे नशीब बदलू शकते. सर्व गोष्टी या लोकांच्या मनाप्रमाणे होतील.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी केतुचे नक्षत्र गोचर अत्यंत फायद्याचे ठरू शकतात. यांना अडकलेले धन परत मिळू शकते. या लोकांचा बँक बॅलेन्स वाढणार आणि आर्थिक स्थिती उत्तम होईल. करिअरसाठी हा वेळ उत्तम आहे. त्यामुळे यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी केतुचे नक्षत्र परिवर्तन मानसिक शांती देणारे ठरू शकतात. जे लोक प्रॉपर्टी गाडी खरेदी करण्यास इच्छुक असेल, त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेन. यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळू शकतो. नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरीची संधी मिळू शकते. हे नक्षत्र परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते.
तुळ राशी
तुळ राशीच्या लोकांसाठी केतुचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरणार. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. व्यवसायात वृद्धी होईल. ज्या लोक नवीन काम सुरू करण्याची इच्छा आहे , त्यांना यश मिळू शकते. धार्मिक स्थळाला भेट देण्या निमित्त या लोकांचा प्रवास करण्याचा योग दिसून येत आहे. या लोकांना अचानक पैसा मिळू शकतो आणि धन लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)