2026 Horoscope Ketu Grah: पापी ग्रह केतूने १८ मे २०२५ ला गोचर करून सिंह राशीत प्रवेश केला होता आणि सूर्याच्या राशीत राहून बरीच उलथापालथ केली. आता पुढच्या वर्षी म्हणजे ५ डिसेंबर २०२६ ला केतू गोचर करून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
डिसेंबर २०२६ मध्ये केतू चंद्राच्या राशी म्हणजे कर्क राशीत जाण्यापूर्वी वर्ष २०२६ च्या पहिल्या ११ महिन्यांत ४ राशीवाल्यांना मोठा फायदा देईल. केतू या लोकांना अचानक पैसा मिळवून देईल आणि त्यांचा आध्यात्मिक कल वाढवेल. जाणून घ्या २०२६ मधील त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ज्यांच्या आयुष्यात केतू ग्रह मोठे आणि सकारात्मक बदल आणू शकतात.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
२०२६ मध्ये केतू वृषभ राशीवाल्यांना पितृ संपत्तीमधून मोठा फायदा देऊ शकतो. मालमत्तेत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. अचानक पैसा मिळाल्याने बँक खात्यात वाढ होईल. नोकरीत मोठे यश मिळू शकते. पगार वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. एखादी मोठी आनंदाची घटना घडू शकते.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीवाल्यांना केतू २०२६ मध्ये सुखी आणि आलिशान जीवन देईल. तुम्ही आरामात आणि सोयीचं आयुष्य जगाल. पैसा कमावण्याचे नवीन मार्ग मिळतील. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचं फळ मिळेल. अध्यात्मात रस वाढेल. धार्मिक प्रवास करू शकता. नातेसंबंधांबद्दल विचार करून निर्णय घ्या.
वृश्चिक राशी (Capricorn Horoscope)
२०२६ मध्ये केतू वृश्चिक राशीवाल्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांतता आणेल. तुम्ही कौटुंबिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. करिअरसाठीही हा काळ शुभ असेल. एकामागोमाग एक यश मिळेल. नोकरी बदलायचा विचार करणाऱ्यांना नवी संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैसा आणि मान-सन्मान दोन्ही मिळतील.
मीन राशी (Pisces Horoscope)
नव्या वर्षी २०२६ मध्ये केतू मीन राशीवाल्यांना अनेक क्षेत्रांत फायदा देऊ शकतो. मात्र शनीची साडेसाती असल्याने काळजी घेणं गरजेचं आहे. उत्पन्न वाढू शकतं, पण तुम्ही आलिशान गोष्टींवर खर्चही कराल. तुम्ही अडचणी आणि अडथळे पार करून करिअरमध्ये यश मिळवू शकता. आरोग्याची काळजी घ्या.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
