Lakshmi Narayan and Budhaditya Rajyog in Hanuman Jayanti: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. अनेकदा सणांच्या दिवशी शुभ योग किंवा राजयोग देखील निर्माण होतात. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. येत्या १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार असून ज्योतिषशास्त्रानुसार यादिवशी सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होईल. तसेच बुध आणि शुक्राच्या युतीमुळे ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण होईल. हे राजयोग हनुमान जयंतीच्या दिवशी तब्बल १०० वर्षानंतर निर्माण होणार असून याच्या शुभ प्रभावाने काही राशींना आकस्मिक धनलाभ तर काही राशींना करिअरमध्ये यश मिळवण्यास मदत मिळेल.
‘या’ तीन राशींना राजयोग देणार धनसंपत्तीचे सुख
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य राजयोगामुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील.आर्थिक समस्या दूर होतील. बँक बॅलन्सही वाढेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे दोन्ही योग खूप सकारात्मक बदल घेऊन येतील. आध्यात्मिक कार्यात अधिक रमून जाल. कुटुंबीयांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रवास घडतील.
कर्क (Cancer)
बुधादित्य आणि लक्ष्मी-नारायण योग कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. तुमचे भाग्य चमकण्यास मदत होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)