Gupt Navratr 2023: हिंदू धर्मात माघ महिना महत्वाचा मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव देखील साजरा करण्यात येतो. माघ महिन्यात गुप्त नवरात्र देखील साजरी केली जाते. मात्र अनेकांना याबाबत माहिती नाही. गुप्त नवरात्रीची सुरुवात हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होते. २२ जानेवारी २०२३ रोजी गुप्त नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हा सोहळा ३० जानेवारी पर्यंत असणार आहे. या नऊ दिवसांमध्ये माँ दुर्गेच्या ९ अवतारांची पूजा केली जाणार आहे. हा गुप्त नवरात्रीचा काळ काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. यामुळे तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे.

‘या’ राशींचे भाग्य चमकणार

मेष राशी

मेष राशीसाठी गुप्त नवरात्रीचा काळ शुभ ठरणार आहे. याकाळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो त्ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. जे लोकं नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ फायद्याचा ठरेल. कारण या काळात अनेकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता दिसत आहे. तसंच जे लोक नोकरी करत आहेत त्यांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती होईल. याशिवाय या काळात लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल.

कन्या राशी

कन्या राशींच्या लोकांसाठी गुप्त नवरात्रीचा काळ शुभ ठरेल. या काळात तुम्ही नवीन घर, दागिने किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता दिसत आहे. तसंच ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला असेल. तसंच या काळात तुम्ही तुमच्या कुटुंब, मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण राहील.

( हे ही वाचा: शनि अमावस्येला ‘या’ राशींचे नशीब पालटणार? २१ जानेवारी पासून तुम्हीही होऊ शकता अपार श्रीमंत)

वृश्चिक राशी

वृश्चिक राशींच्या लोकांना या काळात एखादी चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी सुधारेल. या काळात तुमचा समाजातील मान सन्मान वाढेल. याशिवाय तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. यामुळे तुमचे कुटुंबासोबत असलेले नाते घट्ट होईल.