Magh Purnima 2023 With Ravi Pushya Nakshatra Yog and Sarvartha Siddhi Yog These 5 Zodiac Signs Get Huge Money Astrology | Loksatta

रवी पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ५ राशींना लक्ष्मी देणार धनलाभ? तुमची रास होणार का श्रीमंत, पाहा

Magh Purnima 2023: माघ पौर्णिमेला रवी पुष्य योग व सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने आजपासून काही राशींचा भाग्योदय होऊ शकतो.

Magh Purnima 2023 With Ravi Pushya Nakshatra Yog and Sarvartha Siddhi Yog These 5 Zodiac Signs Get Huge Money Astrology
रवी पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने 'या' ५ राशींना लक्ष्मी देणार धनलाभ? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Magh Purnima 2023: यंदाची माघ पौर्णिमा शनिवारी सुरु होणार आहे. तर 5 रविवारी दुपारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्व आहे. या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो. आज माघ पौर्णिमेला अत्यंत शुभ असे दोन योग सुद्धा जुळून आले आहेत. आज नवीन खरेदीसाठी शुभ मानला जाणारा रवी पुष्य योग व सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने आजपासून काही राशींचा भाग्योदय होऊ शकतो. आज चंद्र स्वराशीत म्हणजेच कर्क मध्ये प्रवेश घेत असल्याने काही राशींना येणारा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. या भाग्यवान राशी कोणत्या व व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे जाणून घेऊयात..

रवी पुष्य नक्षत्र ‘या’ राशींना करणार श्रीमंत?

रवी पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, मात्र या नक्षत्राचा स्वभाव हा गुरु ग्रहाप्रमाणे असतो हे नक्षत्र ज्या राशींच्या भाग्यात आहे अशा मंडळींना येत्या काळात वैभव, धन-समृद्धी लाभू शकते. यंदा माघ पौर्णिमेला हा योग जुळून आला आहे. या दिवशी स्वर्गातील सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात असे मानले जाते. रवी पुष्य नक्षत्र व माघ पौर्णिमेच्या संयोगाने कर्क, कुंभ व तूळ राशीला लाभ होण्याची शक्यता आहे. या मंडळींना येत्या काळात सोन्यात गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होऊ शकतो. तसेच प्रॉपर्टी व वाहन खरेदीसाठी सुद्धा अत्यंत शुभ योग आहेत. तुम्हाला जुन्या आजारांपासून सुद्धा सुटका मिळू शकते.

हे ही वाचा<<शनी लोहाच्या पाउलांनी मार्गी होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? धनलाभ होताना ‘हा’ ठरू शकतो धोका

सर्वार्थ सिद्धी योग ‘या’ राशींना देणार धनलाभ?

माघ पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योग बनल्याने गुरी ग्रहाच्या स्वामित्वाच्या राशींना प्रचंड लाभ होऊ शकतो. अलीकडेच गुरुचे मेष राशीत पदार्पण झाले आहे, त्यामुळे येणार काळ मेष राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. तसेच कन्या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहील.

हे ही वाचा<< महाशिवरात्रीच्या आधी ‘या’ ३ राशींना महादेव देणार धनलाभ? १३ फेब्रुवारीपासून ‘या’ रूपात घरी येऊ शकते लक्ष्मी

जीवनात मोठा बदलहोऊन भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरपूर फायदा होण्याची चिन्हे आहेत. नोकरदार मंडळींना सुद्धा नव्या जॉबशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 11:38 IST
Next Story
शनी लोहाच्या पाउलांनी मार्गी होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? धनलाभ होताना ‘हा’ ठरू शकतो धोका