Shani Dev Transit In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह गोचर करतो तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण मानवी जीवनावर होतो. ज्योतिषतज्ज्ञ सांगतात की, नवग्रहांमध्ये शनी, मंगळ, गुरु, बुध हे ग्रह सर्वात महत्त्वाचे मानले जातात, त्यामुळे या ग्रहांचे गोचर हे अधिक प्रभावशाली ठरू शकते. यंदाच्या वर्षी ३० वर्षातील शनिदेवाचे सर्वात मोठे गोचर झाले आहे. १७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत गोचर करून ३० जानेवारीला अस्त झाले आहेत. आता येत्या काही दिवसांमध्ये शनिदेव लोहाच्या पाउलांनी ० ते ३० अंशामध्ये भ्रमण करार आहेत. शनिदेवाच्या स्थितीनुसार ३ राशींना अत्यंत लाभदायक काळ अनुभवता येणार आहे. चला तर जाणून घेऊयात या तीन नशीबवान राशी कोणत्या आहेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृश्चिक (Scorpio Zodiac)

आपल्या राशीतुन शनिदेव लोहाच्या पाउलांनी गोचर करणार आहे. हे शनीचे राजयोगकारक गोचर ठरत आहे कारण यामुळे शश महापुरुष राजयोग तयार होत आहे. येत्या काळात आपल्याला प्रॉपर्टीच्या खरेदीचे योग आहेत. आपल्या वाडवडिलांच्या संपत्तीतून सुद्धा मोठा लाभ होऊ शकतो. जमिनीची कामे किंवा खटले चालू असल्यास वेळेत पूर्ण होऊ शकतील. या काळात आपल्याला नोकरीच्या नव्या संधी सुद्धा लाभू शकतात. मात्र शनिवर सध्या केतूची दृष्टी आहे यामुळे महिलांच्या आरोग्यास धोका पोहोचण्याची शक्यता असते. विशेषतः आपल्या पाठीचा त्रास सहन करावा लागू शकतो. ३० ऑक्टोबर पर्यंत आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे.

कर्क (Cancer Zodiac)

कर्क राशीत सुद्धा शनिदेवाचे गोचर लोहाच्या पाउलांनी झाले आहे. येत्या काळात आपल्याला मेहनतीचे फळ मिळू शकते. आपल्या वडिलांसह नाती सुधारण्यास मदत होईल. कर्क राशीच्या मंडळींना जुन्या गुंतवनीकटून धनलाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित मंडळींना लग्नासाठी स्थळ येऊ शकते. नोकरदार मंडळींना पगारवाढ व पदोन्नती लाभू शकते. १७ जानेवारी पासून आपल्या राशीत शनी ढैय्या सुरु आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

हे ही वाचा<< शनिदेव नवांश कुंडलीत आल्याने ‘या’ ४ राशी होणार श्रीमंत? धनलाभाने बँक बॅलन्समध्ये होऊ शकते वाढ

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीतून शनी देव लोहाच्या पाउलांनी गोचर करत आहेत. आपल्याला येत्या काळात उधार दिलेले, अडकून राहिलेले पैसे परत मिळू शकतील. येत्या काळात आपल्याला नोकरी बदलाची सुद्धा संधी आहे. याशिवाय काही महिन्यांमध्ये आपल्याला परदेशवारीचे सुद्धा योग्य आहेत. तुम्हाला या काळात आई वडील व घरातील वयस्कर मंडळींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच स्वतःच्या आरोग्याला सुद्धा जपा, गुडघ्याचे त्रास वाढू शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani transit in kumbh rashi with rajyog these three zodiacs can get huge money but be alert astrology svs
First published on: 05-02-2023 at 09:03 IST