ज्योतिषशास्त्रात नवग्रहाच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व असते. हे ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात. ज्याचा १२ राशींच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. अशातच आता ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मानला जाणाऱ्या मंगळ ग्रहाने १६ नोव्हेंबर रोजी गोचर केलं आहे. मंगळ ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ‘रुचक योग’ निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. ज्यामुळे ‘शश राजयोग’ तयार झालाय, जो ३० वर्षांनी घडलाय. त्याचप्रमाणे बुधदेवाने धनु राशीत प्रवेश केलाय. ज्यामुळे ‘महाधन राजयोग’ तयार झालाय. त्यामुळे वर्षाच्या अखेरिस तीन दुर्लभ राजयोग घडल्याने काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

‘या’ राशींना मिळणार बंपर लाभ?

मेष राशी

मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. तीन राजयोग बनल्याने धन आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला करिअर आणि बिझनेसमध्ये विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन कामातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णयही घेऊ शकता. 

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

(हे ही वाचा : तब्बल ५० वर्षांनी ‘विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे नशिब पालटणार? बुधदेव देऊ शकतात प्रचंड धनलाभाची संधी )

वृश्चिक राशी

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी ३ राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतात. नोकरदारांना वेतनवाढ आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. परदेशातही नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. या काळात तुमच्या सर्व मनोकामना यावेळी पूर्ण होऊ शकतात. भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना तीन राजयोग खूप शुभ परिणाम देऊ शकतात. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. या काळात नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. या काळात मोठी डील फायनल होण्याची शक्यता आहे. कमाईचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. अचानक भरपूर पैसा मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)