Mahashivratri 2023: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना आणि व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित केला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. अशी मान्यता आहे की या शुभ दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी होणार आहे. तब्बल ३० वर्षांनी या महाशिवरात्रीला विशेष योगायोग देखील घडत आहेत. त्यामुळे या दिवस काही राशींसाठी शुभ ठरू शकतो. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

मेष राशी

मेष राशीसाठी यंदाची महाशिवरात्र फायदेशीर ठरू शकते. तब्बल तीस वर्षांनी महाशिवरात्री दिवशी विशेष योगायोग घडत आहेत त्यामुळे याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराची उपासना करणं तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं.

वृषभ राशी

महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. या दिवशी तुमची सर्व कामे पूर्ण होऊ शकतात. तसंच या दिवशी भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा राहील. तुमचा अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. तसंच महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराची मनोभावे केलेली सेवा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.\

( हे ही वाचा: २ महिन्यांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? २०२३ चे पाहिले सूर्यग्रहण मिळवून देईल प्रचंड धनलाभाची संधी)

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ असेल. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे केलेली सेवा तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते. तुम्हाला या दिवशी धनलाभ देखील होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तसंच या दिवशी तुमची आधीपासून रखडलेली कामे मार्गी लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ ठरू शकतो. कारण या राशीत शनि आणि सूर्य हे दोन्ही मोठे ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे यादिवशी तब्बल ३० वर्षानंतर विशेष योगायोग घडत आहे. हा योगायोग कुंभ राशीत घडत असल्याने या राशींना महाशिवरात्री दिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसंच रखडलेली कामे देखील याकाळात पूर्ण होतील.

(वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)