माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ‘शिवरात्री’ म्हणतात. दरवर्षी सुमारे १२ शिवरात्री वर्षात येतात, या बारा शिवरात्रींमध्ये येणारी महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान शंकराने या दिवशी तिला पत्नी म्हणून स्वीकारले, असे सांगितले जाते. या दिवशी पहिल्यांदा भगवान विष्णू आणि ब्रम्हाने शिवलिंगाची पूजा केली होती, अशी मान्यता आहे.

महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो. भगवान शिव हे विश्वाचे निर्माते आहेत. ते सर्व ग्रह, नक्षत्र, तंत्र-मंत्र आणि ज्योतिषाचे जनक आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीचा दिवस तंत्र-मंत्र आणि ज्योतिषशास्त्रीय उपायांसाठी विशेष आहे. या दिवशी केलेले उपाय लवकरच फळ देतात. दुसरीकडे कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी शिवाची पूजा करण्यासोबतच नवग्रहाची पूजा केल्याने ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. नवग्रहांना प्रसन्न करण्यासाठी मध्यरात्री २१ वेळा नवग्रह कवच पठण करावे. याने नवग्रह प्रसन्न होऊन त्यांच्यापासून होणारे दु:ख संपेल. नवग्रह कवच पठण करताना स्वच्छ कपडे परिधान करावे, शक्य असल्यास मंत्र म्हणण्यापूर्वी स्नान करा. हे पठण करताना लोकरीच्या आसनावर बसून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. नवग्रह कवचाचे पठण पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तिभावाने करावे.

Maha Shivratri 2022: महाशिवरात्री आणि शिवरात्री यात काय फरक आहे? पूजेची पद्धत आणि मुहूर्त जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवग्रह कवच पाठ
ऊं शिरो मे पातु मार्तण्ड: कपालं रोहिणीपति:.
मुखमंगारक: पातु कण्ठं च शशिनंदन:..
बुद्धिं जीव: सदा पातु हृदयं भृगुनंदन:.
जठरं च शनि: पातु जिह्वां मे दितिनंदन:..
पादौ केतु सदा पातु वारा: सर्वागमेव च.
तिथयौष्टौ दिश: पातु नक्षत्राणि वपु: सदा..
अंसौ राशि सदा पातु योग्श्च स्थैर्यमेव च.
सुचिरायु: सुखी पुत्री युद्धे च विजयी भवेत्..
रोगात्प्रमुच्यते रोगी बन्धो मुच्येत बन्धनात्.
श्रियं च लभते नित्यं रिष्टिस्तस्य न जायते..
पठनात् कवचस्यास्य सर्वपापात् प्रमुच्यते.
मृतवत्सा च या नारी काकवन्ध्या च या भवेत्..
जीववत्सा पुत्रवती भवत्येव न संशय:.
एतां रक्षां पठेद् यस्तु अंग स्पृष्टवापि वा पठेत् ..
.. इति श्री नवग्रह कवचं संपूर्णम् ..