Malvya Rajyog: धन देणारा शुक्र ग्रह काही काळानंतर गोचर करतो. अशावेळी एखादा तरी राजयोग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात ५ महापुरुष राजयोग सांगितले आहेत. त्यापैकी इथे आपण मालव्य राजयोगाबद्दल जाणून घेणार आहोत. हा योग वैभव आणि ऐश्वर्य देणारा असून त्याचे निर्माण शुक्र ग्रह करतो.
शुक्र ग्रह नोव्हेंबर महिन्यात आपल्या स्वराशी म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे मालव्य राजयोग बनेल. या योगाचा परिणाम सगळ्या राशींवर दिसेल, पण काही राशींचे नशीब विशेष चमकू शकते. या लोकांची धन-संपत्ती वाढेल आणि संततीबाबत शुभ बातमी मिळू शकते.
चला तर मग जाणून घेऊ या, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
मकर राशी (Capricorn Horoscope)
मालव्य राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील करिअर आणि व्यवसायाच्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. नोकरी शोधत असलेल्यांना यश मिळू शकते. व्यापाऱ्यांना नवीन ऑर्डर मिळतील आणि त्यातून चांगला नफा होईल. तसेच जर तुम्ही चित्रपटसृष्टी, कला, संगीत किंवा फॅशन डिझायनिंगशी जोडलेले असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूपच उत्तम ठरेल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
तुमच्यासाठी मालव्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून नवव्या भावात जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुमचे नशीब बदलू शकते. धार्मिक आणि सामाजिक कामांमध्ये तुमची सक्रियता वाढेल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल. जर तुम्ही अभ्यास किंवा लेखनाशी संबंधित असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. तुम्ही देश-विदेश प्रवासही करू शकता. या काळात वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूत वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन आणि निकाल मिळतील. आरोग्यही चांगले राहील.
कन्या राशी (Virgo Horoscope)
मालव्य राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून धन आणि वाणीच्या स्थानी जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात चमक येईल. वेळोवेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. कुटुंब आणि मित्रांसोबतचा वेळ आनंदात जाईल आणि प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून नवव्या भावाचे स्वामी असल्याने या काळात नशिबाचा साथ मिळेल. तसेच तुम्ही लहान किंवा मोठा प्रवास करू शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)