वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलत असतो. ग्रहांचे हे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. ग्रहांचा सेनापती म्हटला जाणारा मंगळ ग्रह २४ तासानंतर म्हणजेच ७ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. पण तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे संक्रमण शुभ सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत…
मेष: तुमच्या राशीत मंगळ अकराव्या भावात प्रवेश करेल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हटलं जातं. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायात नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. तसेच, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही करू शकता. तसेच मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. त्यामुळे मंगळाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.




वृषभ: मंगळाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ ग्रह तुमच्या दशम भावात प्रवेश करेल. या स्थानाला कर्म आणि करिअरचे स्थान म्हटले जाते. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. या काळात तुमची कार्यशैली देखील सुधारेल, त्यामुळे तुमच्या कामाचं ऑफिसमध्ये कौतुक होईल. मालमत्ता आणि वाहनाच्या खरेदी-विक्रीतही लाभ होऊ शकतो.
Guru Gochar: गुरु ग्रह १३ एप्रिलला करणा स्व-राशीत प्रवेश, या राशींसाठी ‘अच्छे दिन’
मिथुन: तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह नवव्या भावात भ्रमण करेल. या स्थानाला भाग्य आणि परदेश गमनाचे स्थान म्हणतात. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, बरेच दिवस रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात. आपण या काळात व्यवसायिक टूरवर देखील जाऊ शकता. हा काळ भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात नवीन करार निश्चित करू शकता. स्पर्धक विद्यार्थ्यांना यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. परीक्षेत यश मिळण्यास अनुकूल काळ आहे.