ज्योतिष शास्त्रात सांगितल्यानुसार जेव्हाही कोणता ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्यांचा थेट परिणाम मानवी जीवनावर पडत असतो. येत्या १३ तारखेला मंगल ग्रह वृषभ राशीमध्ये वक्री होणार असून याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. मात्र तीन राशींच्या लोकांना यावेळी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण या राशींच्या लोकांना या काळात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • मेष

मंगळ ग्रहाचे हे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी अशुभ सिद्ध होऊ शकते. या राशीच्या कुंडलीतील दुसऱ्या घरात हे संक्रमण होणार असून हे वाणी आणि धनाचे स्थान मानले जाते. म्हणून या काळात या लोकांना आर्थिक फटका बसण्याचे संकेत आहेत. त्यामुळे कोणताही व्यवहार काळजीपूर्वक करावा. त्याचबरोबर या दिवसांमध्ये सहकाऱ्यांबरोबरचे संबंध विस्कळीत होऊ शकतात.

Photos : २४ नोव्हेंबरनंतर ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकते; गुरुच्या राशी परिवर्तनामुळे मिळणार शुभ वार्ता

  • मिथुन

या राशीच्या कुंडलीतील १२ घरामध्ये मंगळ प्रवेश करणार आहे. हे हानी आणि खर्चाचे घर मानले जाते. म्हणूनच या काळात खर्चामध्ये वाढ होण्याची संभावना आहे. प्रवासादरम्यान नुकसान होऊ शकते. इतकेच नाही तर या काळामध्ये या राशींच्या लोकांना आरोग्यविषयक तक्रारी तसेच नातेसंबंधांतील मतभेदांनाही सामोरे जावे लागू शकते.

१३ नोव्हेंबरनंतर ‘या’ राशीच्या लोकांना होऊ शकतो बक्कळ धनलाभ; बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे नातेसंबंधही सुधारणार

  • तूळ

तूळ राशीच्या कुंडलीतील आठव्या घरामध्ये हे संक्रमण होणार असून हे घर गुप्त रोग आणि वयाचे स्थान मानले जाते. या काळात या राशींच्या लोकांना यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे. तसेच, एखाद्या घटनेला घेऊन या लोकांना मानसिक तणाव जाणवेल. या काळात अपघाताचे योग बनत असल्यामुळे या राशीच्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)