Shukra and Mangal Navpancham Yog: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. तर ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला आत्मविश्वास, उत्साह, ऊर्जेचा कारक ग्रह मानले जाते. २२ मे २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ०५ मिनिटांनी हे दोन्ही ग्रह एकत्र येऊन एकमेकांपासून १२० डिग्रीवर आले. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला. हा राजयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात किंवा एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतात तेव्हा नवपंचम राजयोग निर्माण होतो. या योगाच्या प्रभावाने आयुष्यात सुख-समृद्धी आणि संपत्ती येते.

‘या’ तीन राशींची होणार चांदी

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींना हा राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. वडिलांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.

धनु (Dhanu Rashi)

हा शुभ राजयोग धनु राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)