Mangal Gochar 2024 in Kumbh: ज्योतिषशास्त्रात मंगळ या ग्रहाला विशेष महत्त्वं आहे. मंगळ हा आक्रमकता, उत्साह, धैर्य, शक्ती, उर्जा, जमीन आणि विवाह यांचा कारक मानला जातो. ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळाला संबोधले जाते, तसे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. मंगळाने १५ मार्चला शनिच्या कुंभ राशीत गोचर केलं आहे. यानंतर मंगळ एप्रिलमध्ये राशी बदल करणार आहेत. मंगळदेव शनिदेवाच्या राशीत २२ एप्रिलपर्यंत विराजमान राहणार आहेत. त्यामुळे काही राशींना मंगळाच्या कृपेने गोड बातम्या मिळू शकतात. या काळात बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

‘या’ राशीच्या बँक बॅलेन्समध्ये वाढ होणार?

वृषभ राशी

मंगळदेवाचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला पैसे कमाविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. तुमचा मान सन्मान या काळात वाढू शकतो. जीवनात सुख-सुविधा वाढू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. 

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा

(हे ही वाचा : १४८ वर्षांनी शनि, मंगळ आणि शुक्रदेवाचा जुळून येतोय शुभ योग; ‘या’ राशी होणार श्रीमंत? मिळू शकतो बक्कळ पैसा )

मिथुन राशी

मंगळदेवाचे राशीपरिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येणारे ठरु शकते. नोकरीत बदल, नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. अनेक महिन्यांपासून रखडलेले काम मार्गी लागू शकतात. आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तुमचं बँक बलेन्स वाढण्याची शक्यता आहे. 

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळदेवाचे राशीपरिवर्तन लाभदायी ठरु शकते. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरु शकतो. तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. या काळात तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)