Mars Transit 2025 Negative Effects: २७ ऑक्टोबर रोजी मंगळाने राशी परिवर्तन करीत वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. मंगळ हा ऊर्जा, संघर्ष, धैर्य व आवेश यांचा ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याचा गोचर प्रत्येक राशीच्या जीवनात चांगले-वाईट बदल घडवून आणतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.
या वेळचा मंगळाचा वृश्चिक राशीतला प्रवास ७ डिसेंबरपर्यंत राहणार असून, या काळात काही राशींवर मंगळाचे परिणाम अधिक तीव्र आणि आव्हानात्मक असतील, असं ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणातून दिसतंय. विशेषतः चार राशींच्या लोकांनी या काळात थोडं अधिक सावध राहणं आवश्यक आहे. चला तर पाहूया या राशींच्या लोकांवर मंगळाचा हा गोचर कोणते संभाव्य परिणाम घडवू शकतो.
मंगळाचा बदल आणणार मोठं संकट?
मेष – आरोग्य आणि गुंतवणुकीत सावधान!
मंगळ तुमचा अधिपती ग्रह असल्यामुळे या काळात तुमच्यावर त्याचा दुप्पट प्रभाव पडू शकतो. बदलत्या हवामानात आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. थकवा, ताप, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. ज्योतिषानुसार, ७ डिसेंबरपर्यंत आर्थिक निर्णयांमध्ये घाई करू नका. विशेषतः कुठल्याही जोखमीच्या गुंतवणुकीत दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नये.
वृषभ – नात्यांमध्ये गैरसमज वाढू शकतात!
या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात किंचित तणाव निर्माण होऊ शकतो. जीवनसाथीशी संवादात उग्रपणा टाळा. बोलण्यात संयम राखल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. व्यावसायिक भागीदारीत असलेल्या लोकांनीसुद्धा खबरदारी घ्यावी. कारण- लहान गैरसमजही मोठ्या वादात रूपांतरित होऊ शकतात. ज्योतिषानुसार, ७ डिसेंबरपर्यंत संयम आणि शांतता राखणं हीच खरी गुरुकिल्ली ठरेल.
मिथुन – कार्यक्षेत्रात ताण, आरोग्याकडे लक्ष द्या!
या काळात कामाच्या ठिकाणी मतभेद किंवा तणाव वाढू शकतो. सहकाऱ्यांसोबत गैरसमज टाळा. काही लोकांच्या असहकार्यामुळे मन उदास होऊ शकतं; पण संयमानं वागल्यास परिस्थिती बदलू शकते. ज्योतिष सांगतं की, पोटाशी संबंधित त्रास किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. याकाळात धनहानी होऊ शकते.
धनू – गुप्त शत्रू सक्रिय, खर्च वाढू शकतो!
मंगळाचा हा गोचर धनू राशीच्या लोकांसाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. ७ डिसेंबरपर्यंत काही लपलेले शत्रू किंवा मत्सर करणारे लोक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, असं ज्योतिष सांगतं. या काळात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा; अन्यथा आर्थिक असंतुलन निर्माण होऊ शकतं.
या काळात संयम, साधना व आत्मनियंत्रण ठेवल्यास मंगळाच्या या तीव्र गोचराचे परिणाम सौम्य होऊ शकतात, असं ज्योतिष मानतं. त्यामुळे ७ डिसेंबरपर्यंत संयम राखा, मन स्थिर ठेवा आणि परिस्थितीकडे शांतपणे पाहा. हेच तुमचं खरं संरक्षण कवच ठरेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
