Tri Ekadash Yog 2025: नऊ ग्रहांमध्ये शनीला विशेष महत्त्व असतं. हा ग्रह न्याय आणि कर्माचा कारक मानला जातो. तर ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राजकुमाराचे स्थान बुध ग्रहाला आहे, नऊ ग्रहांपैकी एक असलेला बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्कशास्त्र, गणित, संवाद, हुशारी, भाषण, संवाद आणि मैत्री इत्यादींसाठी जबाबदार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी आणि ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह यांच्या संयोगाने एक चांगला योग जुळून येतोय. शनी आणि बुध ग्रह २६ मे रोजी त्रि-एकादश योग जुळून आणणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या जीवनात चांगले बदल दिसून येऊ शकतात. चला जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत?

‘या’ राशींच्या लोकांना मालामाल होण्याची संधी!

तूळ

त्रि-एकादश योग जुळून येताच तूळ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमच्या आयुष्यात प्रगतीचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते.  प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. जीवनशैलीतील बदलामुळे कौटुंबिक जीवन सुखकर होणार आहे. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

वृश्चिक

त्रि-एकादश योग जुळून आल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तींना चांगले यश मिळू शकते. विद्यार्थी यावेळी त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात.  व्यवसायात प्रचंड नफा मिळू शकतो. या काळात नफ्याचं मार्जिन वाढल्यामुळे बँक बॅलन्स वाढू शकतो.  कर्जापासून मुक्तता मिळू शकते. कुटुंबातील भांडणे आणि वाद थांबू शकतात. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होऊ शकते. मुलांच्या संबंधित आनंदवार्ता मिळू शकते. भौतिक सुख-सुविधा मिळू शकतात. व्यापारात चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ

त्रि-एकादश योग जुळून येताच कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांचा पगार वाढवण्यात येऊ शकतो. पैसे कमवण्यात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला दिसून येऊ शकतात. विवाहित व्यक्तींचे वैवाहिक आयुष्य आनंदाचे आणि सुखकर असे होईल. या काळात त्यांना आदर, मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळू शकेल. उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. नोकरीत प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जुनाट आजारांपासून मुक्तता मिळू शकेल. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. व्यवसायात यश मिळण्याची दाट शक्यता आहे.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)