Mercury transit in leo: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. कुंडलीत बुध शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला अनेक चांगले परिणाम मिळतात. ४ सप्टेंबर रोजी बुध कर्क राशीमधून सिंह राशीत प्रवेश करणार असून बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल.

बुध करणार भाग्योदय (Mercury transit in leo)

मेष

बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने मेष राशींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. तुमचा भाग्योदय होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने अनेक लाभदायी परिणाम पाहायला मिळतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.

हेही वाचा: आकस्मिक धनलाभ होणार; श्रीकृष्णाच्या ‘या’ चार प्रिय राशींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्याचे सुख

सिंह

बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)