हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. यासोबतच लोक या दिवशी उपवासही करतात. या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना मोक्षप्राप्ती होते, असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन देवतांना अमृत पाजले, अशी पौराणिक मान्यता आहे. या दिवशी देवासुराचा संघर्ष संपला. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त…
असा बनतोय ग्रहांचा खास योग
वैदिक कॅलेंडरनुसार, १२ मे रोजी चंद्र कन्या राशीत, शनि कुंभ राशीत आणि गुरु मीन राशीत असेल. तसेच आणखी दोन ग्रह स्वतःच्या राशीत राहतील. त्यामुळे हा एक परिपूर्ण योगायोग ठरत आहे. हा योग राजयोगासारखेच परिणाम देईल. गुरुवार असल्याने १२ मे हा भगवान विष्णूंचाही आवडता दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
मोहिनी एकादशीचा शुभ मुहूर्त:
एकादशी तिथी बुधवार, ११ मे २०२२ रोजी संध्याकाळी ७.३१ पासून सुरू होईल आणि गुरुवार, १२ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६.५१ वाजेपर्यंत चालेल. या काळात तुम्ही कोणत्याही शुभ काळात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांची पूजा करू शकता.
या दिवशी पूजा कशी करावी:
ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून दैनंदिन कामे करून घराची साफसफाई करावी, नंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर भगवंतांसमोर उजव्या हातात जल घेऊन व्रत करावे. आता पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णूचे चित्र किंवा मूर्ती किंवा फोटो स्थापित करा, दिवा लावा आणि तुळशीची पाने ठेवा. यानंतर श्री हरी नारायण यांना अक्षत, हंगामी फळे, नारळ, सुका मेवा आणि फुले अर्पण करा. धूप दाखवून श्री हरी विष्णूची आरती करा आणि एकादशीची कथा ऐका आणि कथन करा.
आणखी वाचा : रस्त्यावर पडलेला पैसा सुद्धा देतो महत्वाची शुभ-अशुभ संकेत; जाणून घ्या, घ्यावे की नाही?
या तिथीचे महत्त्व जाणून घेऊया
धार्मिक मान्यतेनुसार जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी वैशाख शुक्ल एकादशीच्या दिवशी मोहिनीचे रूप धारण केले होते. याच रूपातून भगवानांनी राक्षसांना बंदिवासात बांधले होते, असे म्हणतात. या रूपाने मोहित होऊन राक्षसांनी विष्णूच्या रूपातील एका सुंदर स्त्रीला अमृताचा कलश दिला असे जाणकारांचे मत आहे. तेव्हा भगवंतांनी सर्व अमृत पान देवतांना दिले होते.