ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टिकोनातून सर्व राशीच्या लोकांसाठी जुलै महिना खास आहे. कारण या महिन्यात पाच ग्रह आपले मार्ग बदलणार आहे. सर्वप्रथम, बुध ग्रह २ जुलै रोजी स्वतःच्या राशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर शुक्र ग्रह देखील मिथुन राशीत प्रवेश करेल. १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, १२ जुलैला शनिदेव आणि २९ जुलैला गुरू पूर्वगामी अवस्थेत प्रवेश करेल. २०२२ चा सातवा महिना शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन इत्यादींसाठी कसा राहील, जाणून घेऊया.

  • मेष

या राशींच्या लोकांना या महिन्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही शुभ माहिती मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफर, इच्छित पदोन्नती किंवा बदली असू शकते. या महिन्यात व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य होऊ शकतो. जमीन व इमारतीच्या खरेदी-विक्रीतून लाभ होऊ शकतो. या महिन्यात तुम्हाला राग आणि अहंकार टाळावे लागेल, अन्यथा तुमची प्रतिष्ठा देखील कमी होऊ शकते. जोडीदाराशी जवळीक वाढेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
  • वृषभ

या राशींच्या लोकांना या महिन्यात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात एखादा महत्त्वाचा करार निश्चित होऊ शकतो. ज्यामुळे चांगला नफा मिळू शकतो. या महिन्यात इष्टमित्र किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. परीक्षा-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. या महिन्यात नोकरदार लोकांना नको असलेल्या किंवा अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल.

  • मिथुन

या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सोनेरी यश मिळू शकते. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना या महिन्यात लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. जे निर्यात आणि आयातीचे काम करतात, ते लोक चांगले पैसे कमवू शकतात. मात्र, आजारांपासून सावध राहावे लागेल. या महिन्यात गर्भवती महिलांनी थोडी काळजी घ्यावी.

१४ जुलैपासून सुरू होणार भगवान शंकराचा प्रिय महिना; ‘या’ खास गोष्टी अर्पण करून महादेवाला करा प्रसन्न

  • कर्क

या महिन्यात खर्च थोडे जास्त असू शकतात, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. या महिन्यात व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. या महिन्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. महिन्याच्या शेवटी व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात.

  • सिंह

या महिन्यात तुमचे उत्पन्न वाढू शकते. व्यवसाय आणि करिअरमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. या महिन्यात उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल. यावेळी तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. जोडीदारासोबतचे संबंध मधुर असतील.

  • कन्या

या महिन्यात शेअर बाजार आणि लॉटरीमधून चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही माध्यम, शिक्षणाशी संबंधित असाल, शिक्षक किंवा शाळा, महाविद्यालयाचे संचालक असाल तर हा महिना तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही समस्या असू शकतात. या महिन्यात अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

  • तूळ

या राशींच्या लोकांसाठी जुलै महिना खूप शुभ आणि यशस्वी ठरू शकतो. या महिन्यात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्हाला उच्च पद मिळू शकते किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. या महिन्यात तुम्ही आरामशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता. या महिन्यात तुम्हाला कोर्टाशी संबंधित वादात यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

  • वृश्चिक

या महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टींबाबत तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधातही गैरसमज निर्माण होऊ शकतात. शत्रू तुमच्याविरुद्ध कट करू शकतात. त्यामुळे काळजी घ्या. नोकरदारांना उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. योग्य आहार आणि दिनचर्या सांभाळा. अन्यथा पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. या महिन्यात पैशाशी संबंधित व्यवहारात अधिक सावध राहण्याची गरज आहे.

  • धनु

या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. या महिन्यात तुम्ही कुटुंबासह लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करू शकता. या महिन्यात गुप्त शत्रूंपासून सावध राहा. प्रेमसंबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहू शकते. गर्भवती महिलांनी या महिन्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

Lucky Zodiac Signs : ‘या’ राशींच्या लोकांवर सदैव राहते लक्ष्मीची कृपादृष्टी; मिळते अमाप सुख-संपत्ती

  • मकर

तुमच्यासाठी जुलै महिना संमिश्र जाणार आहे. तुम्ही या महिन्यात व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते पुढे ढकला. कारण सध्या परिस्थिती अनुकूल नाही. वाहन जपून चालवा, अपघात होण्याची शक्यता आहे. व्यवसायाची कागदपत्रे सोबत ठेवा, अन्यथा फसवणूक होऊ शकते. या महिन्यात तुम्हाला मौसमी आजारांबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.

  • कुंभ

हा महिना तुम्हाला अपेक्षित यश आणि नवीन संधी प्रदान करू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही सुख-सुविधेशीसंबंधित कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. जर तुम्ही शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ते काळजीपूर्वक करा. प्रेमसंबंधात जवळीक आणि विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. या महिन्यात पुन्हा एकदा जुना आजार उद्भवू शकतो. तसेच वाहन जपून चालवा.

  • मीन

या महिन्यात तुम्हाला समाजात मान-प्रतिष्ठा मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरतील.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)