Chandrama Guru Yuti 2025 Gaj Kesari Rajyog:  ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरूचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रह १४ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. यासोबतच, २८ मे रोजी दुपारी १:३६ वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत, गुरु-चंद्राची युती होईल, ज्यामुळे ‘गजकेसरी राजयोग’ तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. त्यामुळे या काळात केलेल्या कामात काही राशींना यश मिळण्याची शक्यता आहे. त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…

गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे उजळेल नशीब?

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योगामुळे वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. कामात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.अचानक लाभाच्या संधी वाढू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पदोन्नती आणि बदली मिळू शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे.

वृश्चिक

गजकेसरी योगाची निर्मिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला व्यवसायातून भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबतीत खूप फायदा होण्याची शक्यता आहे.

कुंभ 

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी गुरू आणि चंद्राची युती शुभ सिद्ध होऊ शकते. व्यवसायात चांगला नफा होऊन अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते. नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या कालावधीत देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. तुम्हाला भागीदारीच्या कामातही यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळू शकते. दांपत्य जीवन आनंदी राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)