Numerology Prediction By Date Of Birth : अंकशास्त्र एक प्राचीन शास्त्र आहे; जे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, जीवनाची दिशा आणि नशिबाचे मूल्यांकन करण्यासाठी संख्येचा वापर करतात. या शास्त्रात, व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज करून (मूलांक) काढला जातो. मूलांक संख्या १ ते ९ पर्यंत असते आणि ती एकेक ग्रहाशी संबंधित असते. हा ग्रह व्यक्तीच्या स्वभावावर, विचारांवर आणि निर्णय घेण्यावर प्रभाव पाडतो. म्हणजेच तुमची जन्मतारीख २२ असेल तर २ + २ = ४ ; म्हणजेच तुमचा मूलांक ४ आहे. अशाप्रकारे तुमचा मूलांक काढा.
तर आज आपण या बातमीतून एका खास मूलांक संख्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना सर्वात बुद्धिमान आणि हुशार मानले जाते. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक हा ५ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह बुध असतो; जो बुद्धिमत्ता, आणि संवादाचा कारक मानला जातो. बुधाच्या प्रभावामुळे,या मुली भरपूर हुशार असतात. अंकशास्त्रानुसार, ५ अंक असलेल्या मुली घाईघाईने निर्णय घेत नाहीत. त्या प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करून निर्णय घेणे पसंत करतात. कोणताही धोका पत्करण्यापूर्वी त्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचे विश्लेषण करतात आणि मगचं नक्की काय करायचं ते ठरवतात.
नैसर्गिकरित्या साध्या आणि इतरांशी संवाद साधण्यात सौम्य
५ मूलांक असणाऱ्या मुली त्यांच्या बुद्धीचा वापर करून त्यांचे करिअर निवडतात, कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करतात. त्यांच्या क्षमतेच्या आधारे त्या उच्च पदे मिळविण्यात यशस्वी ठरतात.अंकशास्त्रानुसार, ५ मूलांक असणाऱ्या मुली नैसर्गिकरित्या साध्या आणि इतरांशी संवाद साधण्यात सौम्य असतात. त्या त्यांच्या शब्दांनी किंवा वागण्याने कोणालाही दुखावत नाहीत, ज्यामुळे त्या सामाजिकदृष्ट्या यशस्वी होतात. कोणापासून दूर राहायचे आणि कोणाबरोबर नाती टिकवून ठेवायची याबद्दल त्यांना चांगली समजत असते. म्हणूनच त्या सहजासहजी कोणामध्येही मिसळत नाहीत आणि गोष्टी स्वतःच्या पद्धतीने करण्याला प्राधान्य देतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
