नाव ज्योतिष ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा आहे. याला इंग्रजीत ‘नेम अ‍ॅस्‍ट्रोलॉजी’ असे म्हणतात. नाव ज्योतिषाच्या माध्यमातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि त्याचे भविष्य जाणून घेता येते. नावाच्या पहिल्या अक्षरावरून ती व्यक्ती कशी आहे हे सहज कळते. आज आपण अशा काही लोकांबद्दल जाणून घेणार आहोत जे खूप भाग्यवान आहेत आणि त्यामागील कारण आहे त्यांच्या नावाचे पहिले अक्षर. हे लोक विलासी जीवन जगतात आणि त्यांच्याकडे नेहमीच भरपूर संपत्ती असते.

N पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती :

असे लोक ज्यांचे नाव N अक्षराने सुरू होते, ते नेहमी आरामदायी जीवन जगतात. या लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप पैसा तर मिळतोच, पण त्यांना मान-सन्मानही मिळतो. त्यांच्या स्वभावामुळे लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात. हे लोक धाडसी आणि निडर असतात, त्यामुळे ते व्यवसायात खूप प्रगती करतात.

Chandra Grahan 2022 : यंदाचे चंद्रग्रहण ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार शुभ; मिळतील खूप फायदे

P पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती :

ज्यांचे नाव P ने सुरू होते ते नेहमी सुख-सोयीचे जीवन जगतात. लक्झरी लाइफ मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत नाही, त्यांना ते सहज मिळते. या लोकांवर कुबेर देवांचा आशीर्वाद आहे असेही म्हणता येईल.

S पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती :

ज्या लोकांचे नाव S अक्षराने सुरू होते ते मेहनती, हुशार आणि उत्साही असतात. हे लोक लहान वयातच ध्येय निश्चित करतात आणि ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रम सुरू करतात. नशीब देखील त्यांना साथ देते आणि त्यांना त्यांच्या जीवनात अपार संपत्ती, सन्मान आणि उच्च स्थान मिळते. हे लोक खूप चांगले लाइफ पार्टनर देखील सिद्ध होतात. त्यांच्यावर सदैव कुबेर देवाची कृपा राहते.

V पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती :

ज्यांचे नाव V अक्षराने सुरू होते ते पैशाच्या बाबतीतही खूप भाग्यवान असतात. त्यांना जीवनातील सर्व सुख-सुविधा आरामात मिळतात. त्यांना फिरणे आणि खाणे खूप आवडते. यासाठी ते खूप पैसे देखील खर्च करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)