Personality Traits : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंकशास्त्रात व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याविषयी माहिती सांगितली जाते. कोणत्याही महिन्याच्या एखाद्या तारखेला जन्मलेल्या लोकांना त्यांच्या मूलांकनुसार त्यांचा स्वभाव, भविष्य आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेता येते. आज आपण कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. या लोकांचा मूलांक ७ असतो. या लोकांना कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्याचबरोबर या लोकांवर केतुचा प्रभाव असतो. या लोकांना खोटं बोलायला आवडत नाही आणि खोटं बोलणाऱ्या लोकांचा यांना राग येतो. ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कसे असते, याविषयी आज सविस्तर जाणून घेऊ या.

आर्थिक स्थिती

ज्या लोकांचा मूलांक ७ असतो, ते अत्यंत स्वतंत्र विचारांचे असतात. त्यांना मनाप्रमाणे आयुष्य जगायला आवडते. या लोकांना कोणाच्याही पुढे नतमस्तक व्हायला आवडत नाही. हे लोक आपल्याच जगात मग्न असतात. हे लोक सतत कामात व्यस्त असतात. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असते. या लोकांमध्ये एक आगळी वेगळी शक्ती असते ज्यामुळे त्यांना भविष्याचा अंदाज येतो. कोणतेही काम ते मनापासून करतात त्यामुळे त्यांना यश सहज मिळते. विशेष म्हणजे यांना नेहमी नशीबाची साथ मिळते. नशीबाच्या जोरावर अनेकदा ते अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवतात.

हेही वाचा : ४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या धन व बँक बँलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ? शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे नशीब अचानक पालटणार

स्वभावाने खूप दयाळू असतात

अंकशास्त्रानुसार ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेली लोक अस्थिर असतात. यांचे मन एकाच गोष्टीवर जास्त वेळ टिकून राहत नाही. यामुळे यांना करीअरमध्ये नुकसानीचा सामना करावा लागतो. ते मनाने खूप स्वच्छ आणि निर्मळ असतात. हे लोक कोणाच्याही बोलण्यावर सहज विश्वास ठेवतात त्यामुळे अनेकदा त्यांचा विश्वासघात होतो. हे लोक स्वभावाने खूप दयाळू असतात. त्यांच्या याच स्वभावाचा इतर लोक गैरफायदा घेतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योग्य मार्गदर्शन करणारे लोक आवडतात

मूलांक ७ असलेल्या लोकांना फिरायला खूप आवडते. कामातून वेळ काढून हे लोक फिरायला जातात. दान धर्मात हे लोक यांचा जास्तीत जास्त पैसा खर्च करतात. या लोकांना योग्य मार्गदर्शन करणारे लोक आवडतात ज्यामुळे त्यांना त्यांच्यापासून काहीतरी शिकायला मिळेल. त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडते. हे लोक धार्मिक स्वभावाचे मानले जातात. विशेष म्हणजे हे लोक नेहमी आनंदी राहतात.