Numbers Will Be Blessed By Durga: ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या प्रकारे कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज वर्तवला जातो, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या तारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य, गुणांचे वर्णन केले जाते. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकावर विशिष्ट देवी-देवतेचा आणि ग्रहांची कृपा असते. दरम्यान, सध्या नवरात्रीचा काळ सुरू असून नवरात्रीच्या नऊ दिवसांचा काळ काही मुलांकाच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
मुलांक कसा ओळखायचा?
अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेचा एकांक हा मूलांक असतो. म्हणजेच समजा जर एखादी व्यक्ती कोणत्याही महिन्यातील ९, १८, २७ या तारखेला जन्मली असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक ९+ १ = ९, २ + ७ = ९ असतो. अशाप्रकारे १ ते ९ हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो, तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.
नवरात्रीचा काळ ‘या’ मूलांकासाठी फायदेशीर
मूलांक ६
कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ६ असतो. या मूलांकाचा स्वामी शुक्र असून या मूलांकावर देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न असतात. त्यामुळे नवरात्रीच्या काळातही देवीची यांच्यावर विशेष कृपा होईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
मूलांक ९
कोणत्याही महिन्याच्या ९,१८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ९ असतो. या मूलांकाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ९ मूलांकाच्या व्यक्तींवर जगदंबेची विशेष कृपा असते. शिवाय नऊरात्रीतही ९ अंक असल्याने या मूलांकांच्या लोकांसाठी हा काळ खूप सुखदायी जातो. या काळात या मूलांकाच्या लोकांना देवीची विशेष कृपा प्राप्त होते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)