Aajche Rashi Bhavishya In Marathi 24 September 2025 : आज २४ सप्टेंबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. आज इंद्र योग जुळून येईल आणि चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत असेल आणि आज राहू काळ ३ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या नवरात्रीचा तिसरा दिवस असणार आहे. आज चंद्रघंटा देवी कोणत्या राशीचे दुःख दूर करणार जाणून घेऊया…

२४ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi 24 September 2025 )

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल. मुलांबाबतची चिंता दूर होईल. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

मनाची चलबिचलता जाणवेल. विचार भरकटू देऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल. वादाचे मुद्दे टाळावेत. गुंतवणूक करताना जोखीम पत्करू नये.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

अकारण खर्च टाळावा. संमिश्र घटनांचा दिवस. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वातावरण लक्षात घेऊन काम करावे. अडकलेले धन प्राप्त होण्याची शक्यता.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. नवीन व्यवसायास गती मिळेल. तुमचा मान वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

चोख हिशोब ठेवावा. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल. मान, सन्मानात वाढ होईल. दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. कामाचा ताण जाणवू शकतो. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

स्वत:च्या सुखासाठी पैसा खर्च कराल. प्रतिपक्षावर मात कराल. धनलाभाचे योग जुळून येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. परिस्थितीचा ताळमेळ साधाल.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

कौटुंबिक ताणतणाव टाळावेत. मित्रांशी जवळीक साधाल. मुलांची चिंता लागून राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांची गाठ पडेल.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल. आहाराची पथ्ये पाळावीत. मिळकतीचा नवीन स्त्रोत सापडेल.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

जुन्या विचारांना मनातून काढून टाका. भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी. व्यापारी वर्गाने सबुरीने घ्यावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

मानसिक स्वास्थ्य ढळू देऊ नका. सट्टा, जुगारापासून दूर रहा. नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. विनाकारण प्रवास घडेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

प्रतिस्पर्ध्याबरोबर हुशारीने वागावे. पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी. मानसिक ताण घेऊ नये. कार्य व अधिकार वाढतील. कौशल्याचा वापर करावा लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर