Lalita Panchami Rashifal: सध्या देशभरात शारदीय नवरात्री साजरी केली जात असून येत्या २६ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस साजरा केला जाईल. या दिवशी स्कंदमातेच्या पूजेसह ललिता पंचमीदेखील साजरी केली जाते. ललिता देवी ललिता त्रिपुरा सुंदरी, षोड्शी आणि राजेश्वरी या नावांनीही ओळखली जाते. तिला सौंदर्य, शक्ती आणि सौभाग्याची देवी मानले जाते. यंदा योगायोगाने या दिवशी देवीला प्रिय असलेला वार शुक्रवारदेखील आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच लाभदायक सिद्ध होईल.
ललिता पंचमीला चमकणार ‘या’ राशींचे भाग्य
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ललिता पंचमीचा दिवस अत्यंत शुभ असेल. या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ललिता पंचमीचा दिवस अत्यंत शुभ असेल. अविवाहितांसाठी विवाहाचा योग जुळून येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
वृश्चिक (Vrushchik Rashi)
वृश्चिक राशीसाठी हा काळ सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल. या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. भौतिक सुख प्राप्त कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आयुष्यात अनेक दिवसांपासून येणारे अडथळे दूर होतील. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
मीन (Meen Rashi)
मीन राशीसाठी ललिता पंचमीचा दिवस खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात अविवाहितांसाठी विवाहाचा योग जुळून येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)