1 October Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार सण-उत्सवांदरम्यान अनेक योग आणि राजयोग तयार होतात. त्याचा परिणाम माणसांच्या जीवनावर तसेच देश-विदेशावर दिसतो. या वर्षी महानवमीचा सण १ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी ५ खास संयोग होत आहेत. या दिवशी सूर्य-बुध युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे. त्याचबरोबर बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे भद्र महापुरुष राजयोग तयार होत आहे.
सूर्य-यम युतीमुळे नवपंचम योग आणि शुक्र-गुरु युतीमुळे अर्धकेंद्र योग होत आहे. तसेच रवि योगही होत आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. त्या राशींना अचानक धनलाभ होण्याची व प्रगतीची संधी मिळू शकते. चला तर मग पाहूया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी ५ ग्रहांचा खास संयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण भद्र आणि बुधादित्य राजयोग तुमच्या राशीच्या धन भावात होत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल. पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ आहे. ज्यांचा काही वाद सुरू आहे त्यांना चांगला निकाल मिळू शकतो. तसेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
कन्या राशी (Virgo Horoscope)
पाच ग्रहांचा खास संयोग कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. कारण भद्र आणि बुधादित्य राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा गौरव मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठीही महानवमी शुभ असेल, अभ्यासात यश मिळण्याचे योग आहेत. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.
मकर राशी (Capricorn Horoscope)
तुमच्यासाठी ५ ग्रहांचे खास संयोग फायदेशीर ठरू शकतात. कारण भद्र आणि बुधादित्य राजयोग तुमच्या राशीच्या नवव्या भावात होत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही एखादी महाग वस्तू खरेदी करू शकता. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)